Headlines

US Iran Deal Donald Trump Masoud Pezeshkian Sign 14 Points Mentioned in Agreement; अमेरिका, इराणने शांततेच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या; डीलमध्ये नक्की काय ठरलं?


US Iran Peace Deal MOU : डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

US Iran Peace Deal MOU
अमेरिका-इराण शांतता करार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
US Iran Peace Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर औपचारिकपणे स्वाक्षरी केली आहे. अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्षांनी काल बुधवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून हा करार तात्काळ अंमलात आला आहे, अशी देखील माहिती दिली आहे.

अखेर संघर्ष संपुष्टात…

एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान अमेरिका-इराण कराराच्या कागपत्रांवर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. स्वाक्षरी केलेल्या कराराच्या प्रती इराण आणि मध्यस्थ देशांना पाठवण्यात आल्या आहेत. यापूर्वी रविवारी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे मुख्य वाटाघाटीकार, मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याने दोन्ही देशांमधील जवळपास चार महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे.
Maharashtra TimesUS Iran Peace Deal: ट्रम्प यांचा दावा फुसका! US-इराण करारात अखेरच्या क्षणी गेम; होर्मुझचा विषय जगाला ‘महागात’ पडणार

‘इराणकडे कधीही अणुशस्त्र असू नये’

तात्पुरत्या शांतता कराराला पाठिंबा देण्याचा निर्णय स्पष्ट करताना, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, ‘इराणकडे कधीही अणुशस्त्र असू नये’. त्याचवेळी, त्यांनी असही सुचवलं की, ‘तेहरान युरेनियम संवर्धनाची क्षमता कायम ठेवू शकेल, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा विकास सुरू ठेवू शकेल आणि यापूर्वी गोठवलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या मालमत्तेचा ताबा पुन्हा मिळवू शकेल’, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

गेल्या 24 तासांत काय-काय घडलं?

डोनाल्ड ट्रम्प यांच्यामते युद्धाला थांबा देणं, होर्मुजला परत उघडणं आणि इराणला परमाणु शस्त्रापासून रोखणं हे आमचं ध्येय होतं, जे आता पूर्ण झालं आहे.

‘जर इराणने अमेरिकेसोबत झालेल्या कराराचं उल्लंघन केलं, तर आम्ही पुन्हा युद्धाला सुरुवात करु’, असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही इराणला परमाणू शस्त्र मिळू देणार नाही’, अशी भूमिकाही त्यांनी घेतलीय.
Maharashtra TimesUS Iran Peace Deal Explained: अमेरिका-इराणमध्ये शांतता करार, फक्त स्वाक्षऱ्या बाकी; तेवढ्यात इस्रायलची स्पष्टोक्ती, ‘आम्ही लागू करणार नाही!’
‘अमेरिका-इराण यांनी युद्धाबाबत घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी कौतुक केलं पाहिजे’, असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटलं आहे.

CNNच्या रिपोर्टनुसार अमेरिका-इराणने केलेल्या सामंजस्य करारात युद्ध थांबवणे, होर्मुज खाडी उघडणे, तेल निर्यात आणि अडकलेला पैसा अशा 14 मुद्द्यावर सहमती दर्शवली आहे.
Maharashtra TimesUK Social Media Ban: सोळा वर्षांखालील मुलांना ब्रिटनमध्येही ‘सोशल’बंदी; अ‍ॅप वापरावर निर्बंधाची पंतप्रधान स्टार्मर यांची घोषणा
‘300 अरब डॉलरच्या पॅकेजच्या बातम्या खोट्या आहेत. जर इराणला सर्व अटी मान्य असतील, तर दूसरे देश पैसा अडकवू शकतात. पण अमेरिका पैसा नाही देणार’, असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी म्हटलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा