Headlines

UK PM Keir Starmer: ब्रिटनचे पंतप्रधान राजीनामा देणार? कीर स्टार्मर यांच्यावर शंभरपेक्षा अधिक खासदारांचा दबाव – is british prime minister keir starmer resigning on today 22 june 2026


UK PM Keir Starmer: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे आज पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात, असं बोललं जात आहे.

keir
ब्रिटनचे पंतप्रधान राजीनामा देणार?(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे आज, सोमवारी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता असून, डाउनिंग स्ट्रीटमधून सन्मानपूर्वक पायउतार होण्यासाठी त्यांनी वेळापत्रकही तयार केल्याचे वृत्त ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

‘आपल्या नेतृत्वाला मिळणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा खंबीरपणे सामना करू,त्तानुसार, गेल्या दोन दिवसांत मंत्रिमंडळातील सहकारी, पक्षाला अर्थसाह्य करणारे आणि कामगार संघटनांच्या नेत्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर स्टार्मर या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.

Maharashtra TimesUS Iran Deal: हा तर विश्वासघात! संतप्त इराणकडून मोठी घोषणा; USसोबतचा करार संकटात, युद्धाचे ढग पुन्हा दाटले
पंतप्रधान राजकीय वास्तवावर विचार करत आहेत. पक्षांतर्गत आवश्यक पाठबळ आता शिल्लक राहिलेले नाही, या वास्तवाचा स्टारमर यांना सामना करावा लागत असल्याचे एका सूत्राने सांगितले. बोरीस जॉन्सन यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘लोकप्रवाह बदलतो, तेव्हा तो बदलतोच,’ असे सूत्रांनी म्हटले आहे.

अँडी बर्नहॅम चर्चेत
५६ वर्षीय अँडी बर्नहॅम यांना स्टार्मर यांचे सर्वांत प्रबळ उत्तराधिकारी मानले जाते. मेकरफिल्ड पोटनिवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर त्यांनी देशाला एका नव्या दिशेने नेण्याचे वचन दिले आहे.

Maharashtra TimesMeloni vs Trump: मी आणि इटली कधीही भीक मागत नाही! मेलोनींचं ट्रम्प यांना सडेतोड प्रत्युत्तर; जगभरात चर्चा
भारतीयावर आरोप
लंडन :
पश्चिम लंडनच्या साउथॉल उपनगरात २६ वर्षीय भारतीयावर चाकूहल्ल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकावर आरोप ठेवण्यात आले आहेत . गेल्या आठवड्यात गुरभेज सिंग यांच्या खुनाच्या संशयावरून अटक केल्यानंतर २० वर्षीय नवज्योत सिंग याच्यावर खून, हेतुपुरस्सर गंभीर शारीरिक इजा आणि प्राणघातक शस्त्र बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे . १० जून रोजी हल्ल्याची घटना घडली होती .

अन्यथा बॉम्बफेक करीन
वॉशिंग्टन : ‘भरपूर मोबदला घेणाऱ्या लेबनॉनमधील ‘मध्यस्थां’ना (हिजबुल्लाह) इराणने तातडीने रोखावे; अन्यथा अमेरिका इराणवर पुन्हा जोरदार बॉम्बफेक सुरू करील ,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दिला. स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका व इराण यांच्यात चर्चा सुरू असतानाच ट्रम्प यांनी हा इशारा दिला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा