UK PM Keir Starmer: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे आज पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात, असं बोललं जात आहे.

‘आपल्या नेतृत्वाला मिळणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा खंबीरपणे सामना करू,त्तानुसार, गेल्या दोन दिवसांत मंत्रिमंडळातील सहकारी, पक्षाला अर्थसाह्य करणारे आणि कामगार संघटनांच्या नेत्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर स्टार्मर या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.
US Iran Deal: हा तर विश्वासघात! संतप्त इराणकडून मोठी घोषणा; USसोबतचा करार संकटात, युद्धाचे ढग पुन्हा दाटले
पंतप्रधान राजकीय वास्तवावर विचार करत आहेत. पक्षांतर्गत आवश्यक पाठबळ आता शिल्लक राहिलेले नाही, या वास्तवाचा स्टारमर यांना सामना करावा लागत असल्याचे एका सूत्राने सांगितले. बोरीस जॉन्सन यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘लोकप्रवाह बदलतो, तेव्हा तो बदलतोच,’ असे सूत्रांनी म्हटले आहे.
अँडी बर्नहॅम चर्चेत
५६ वर्षीय अँडी बर्नहॅम यांना स्टार्मर यांचे सर्वांत प्रबळ उत्तराधिकारी मानले जाते. मेकरफिल्ड पोटनिवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर त्यांनी देशाला एका नव्या दिशेने नेण्याचे वचन दिले आहे.
Meloni vs Trump: मी आणि इटली कधीही भीक मागत नाही! मेलोनींचं ट्रम्प यांना सडेतोड प्रत्युत्तर; जगभरात चर्चा
भारतीयावर आरोप
लंडन : पश्चिम लंडनच्या साउथॉल उपनगरात २६ वर्षीय भारतीयावर चाकूहल्ल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकावर आरोप ठेवण्यात आले आहेत . गेल्या आठवड्यात गुरभेज सिंग यांच्या खुनाच्या संशयावरून अटक केल्यानंतर २० वर्षीय नवज्योत सिंग याच्यावर खून, हेतुपुरस्सर गंभीर शारीरिक इजा आणि प्राणघातक शस्त्र बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे . १० जून रोजी हल्ल्याची घटना घडली होती .
अन्यथा बॉम्बफेक करीन
वॉशिंग्टन : ‘भरपूर मोबदला घेणाऱ्या लेबनॉनमधील ‘मध्यस्थां’ना (हिजबुल्लाह) इराणने तातडीने रोखावे; अन्यथा अमेरिका इराणवर पुन्हा जोरदार बॉम्बफेक सुरू करील ,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दिला. स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका व इराण यांच्यात चर्चा सुरू असतानाच ट्रम्प यांनी हा इशारा दिला.

