Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये गुलशन कुमार मृत्यूप्रकरणी भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – भारतीय संगीत क्षेत्रातील ‘कॅसेट किंग’ म्हणून ओळखले जाणारे गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. मंदिरातून परत येत असताना १६ गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण देशाला धक्का बसला होता. अशातच आता याप्रकरणी उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
एका जुन्या मुलाखतीमध्ये उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं की, नदीम सैफी हा गुलशन कुमार यांच्या हत्येचा मास्टरमाइंड आहे. आता एका मुलाखतीमध्ये गुलशन कुमारच्या हत्येबद्दल बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘गुलशन कुमारची हत्या त्यांच्या आपापसातील वादावरून करण्यात आलेली. मला त्याबद्दल सांगणं योग्य वाटत नाही. आपापसातील वाद, प्रोफेशनल वाद यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या एका शुटरला अटकही करण्यात आली. पण, त्या मागचे मास्टर माइंड समोर आले नाहीत. त्यांचा हेतू वेगळा होता. अल्का याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वादसुद्धा गुलशन कुमार यांच्या हत्येचं कारण आहे. आम्हाला तपासादरम्यान याबद्दल समजलं. आणि आता याबद्दल बोलून काही फायदा नाही. कारण, त्याचा पुरावा नाही.’
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
‘नदीम सैफी भारतात यायला तयार होता, पण तो नाही आला. अजूनही त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आपल्या Dying declaration कायद्यानुसार, मृत व्यक्ती शेवटी जे काही बोलला असेल ते खरं मानलं जातं. पण, फॉरेन कोर्टमध्ये त्यांच्या कायद्यानुसार आपले पुरावे तपासले जातात. गुलशन कुमारच्या केसमध्येही Dying declaration होतं. पण, फॉरेन कोर्टमध्ये त्याला मान्यता दिली नाही.’ असं उज्ज्वल निकम यांनी शेवटी सांगितलं. ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उज्ज्वल निकम बोलत होते. Maharashtrachi Hasyajatra : लॉर्ड शार्दुल ठाकूरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ, क्रिकेटरनं केलं समीर चौघुलेंचं कौतुक इतकंच नव्हे तर शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुराधा पौडवाल यांना गुलशन कुमार यांच्या हत्येबद्दल विचारण्यात आलं. त्यावर अनुराधा म्हणाल्या की, ‘मला माहीत नाही. मला नकारात्मक गोष्टींमध्ये कधीच रस नव्हता. जरी काही असलं तरी, गुलशनजी माझ्याशी त्याबद्दल कधीच बोलले नाहीत. त्यामुळे त्यावेळी काय घडत होतं हे सांगण्याच्या स्थितीत मी नाही. मी खरं बोलते. मी नेहमीच स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवलं आहे.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा