Isha Keskar On Rishi Saxena : मराठी अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना ९ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतायत. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं ऋषीच्या प्रेमात पडण्याचं कारण सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेता ऋषी सक्सेना ला झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली आणि तो घराघरात पोहोचला. ऋषी हा मुळचा राजस्थानचा असून त्यानं जोधपुर येथे शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ऋषी मॉडेलिंगसाठी मुंबईत आला. त्यानंतर त्यानं वडिलांच्या सांगण्यावरून अभिनयात येण्याचा निर्णय घेतला. नाटकांमध्ये काम केल्यानंतर मित्राच्या सांगण्यावरून अभिनेत्यानं ‘काहे दिया परदेस’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि ऋषीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अभिनेता प्रोफेशनल आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. ऋषी सक्सेना मराठी अभिनेत्री ईशा केसकरसोबत ९ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतोय. याबद्दल ईशानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. याच मुलाखतीमध्ये ईशानं ऋषीच्या प्रेमात पडण्याचं कारणही सांगितलं आहे.
अभिनेत्रीनं सांगितलं प्रेमात पडण्याचं कारण
मुलाखतीदरम्यान ईशा केसकर म्हणाली की, ‘ऋषीची मला कोव्हिडमध्ये खूप जास्त मदत झाली. आम्ही दोघंही एकमेकांसाठी उभे राहिलो. मी अशा लोकांच्या सहवासात मोठी झालीये, जे एकमेकांना समजून घेणारे आहेत. मी ऋषीच्या प्रेमात पडले ते त्याची भाषा पाहून नाही तर. ऋषी कसा आहे, त्याचं माझं काय मॅच होतंय, माझा काय कम्फर्ट आहे? त्या हिशोबानं मी प्रेमात पडले. त्या परिस्थितीसाठी ते योग्य होतं. कोव्हिडच्या दरम्याने माझे वडील गेले, तेव्हा तो कायम माझ्याबरोबर होता. त्याची साथ होती म्हणूनच मला एकटं वाटलं नाही. त्यामुळे मी नेहमी या सगळ्याचं श्रेय त्याला देते.’
ईशा केसकरने सांगितलं गुपित, येतोय नवा सिनेमा, मोठमोठ्या कलाकारांसोबत दिसणार,पण सिनेमांचं नाव काय?
ईशा पुढे म्हणाली की, ‘एक मित्र म्हणून माझं त्याच्यावर विशेष प्रेम आहे. तो माणूस म्हणून पण खूपच चांगला आहे. तो एका हेल्दी वातावरण असलेल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याला त्याच्या आई-बाबांचा कायम पाठिंबा मिळालाय. भावनिक सपोर्टही खूप चांगला आहे. त्यामुळे तो माणूस म्हणून ग्रीन फ्लॅग, एकदम ग्रीन फॉरेस्ट आहे.’ Medha Manjrekar : ‘ट्रीपवरून आल्यावर टेस्ट केली, 8 महिन्यांपासून कॅन्सरचा प्रवास सुरू आहे’, आजारपणावर मेधा मांजरेकर यांची प्रतिक्रिया ‘तो माझ्यासाठी मराठी भाषा शिकला. मी त्याला एका जागी बसून मराठी शिकवलेलं नाहीये. मी थेट भांडायचे. त्यामुळे तो ऐकून-ऐकून हळुहळू शिकला. मग, मी जरा पुढाकार घेतला की, तुझे मराठीचे उच्चार वगैरे बरे आहेत आणि अशाप्रकारे तो मराठी शिकला.’ असंही ईशानं शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईशा केसकर बोलत होती.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा