Headlines

Uddhav Thackeray Shiv Sena Condition to BJP Congress for Mayor Chandrapur Municipal Election Result ; महापौरपद देणार असाल, तर समर्थन देतो; ठाकरेसेनेच्या मागणीने ट्विस्ट, प्रत्येकवेळी नमतं घेतलं पण…


Chandrapur Municipal Election Result : प्रत्येक निवडणुकीत एकदिलाने साथ दिली. पण आता आमची इच्छा आहे की, मनपात शिवसेनेचाच महापौर बसावा, असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे

Uddhav Thackeray Chandrapur Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : महापौर आरक्षणाची सोडत पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापौरपद देत असाल तरच समर्थन देऊ अशी ठाम भूमिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतली आहे. दरम्यान, मनपात शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीचा आठ सदस्यांचा एक गट तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. ६६ सदस्य असलेल्या मनपामध्ये भाजपचे २३ तर शिवसेनेचा एक असे मिळून युतीचे २४ संख्याबळ आहे. तर काँग्रेसचे २७ व भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ३ सदस्य असल्याने काँग्रेसचे संख्याबळ ३० आहे.

सत्ता स्थापनेसाठी ३४ ही मॅजिक फिगर आहे. शिवसेना (उबाठा) ६, वंचित बहुजन आघाडी २, अपक्ष २ तर बसप व एमआयएमकडे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. भाजपला १० तर काँग्रेसला ४ जागांची गरज आहे. आता मनपात शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीचा आठ सदस्यांचा एक गट तयार केला आहे. सत्ता स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची स्थिती असलेल्या शिवसेना(उबाठा)ला काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून समर्थनाबाबत आधीच विचारणा झालेली आहे.
Maharashtra TimesBMC Election 2026 : राज साहेब, किती वेळा तुम्ही… मनसेबाहेर पडलेल्या संतोष धुरींचा बोचरा सवाल, थेट म्हणाले मनसेची चेष्टा झाली आणि…
दरम्यान, ‘राज्यस्तरावर महाआघाडी असताना आजवर प्रत्येक वेळेस आम्ही नमते घेतले. त्यामुळे अनेकवेळा पदापासून आम्ही दुरावलो. पण कधीही पदाची अपेक्षा केली नाही. प्रत्येक निवडणुकीत एकदिलाने साथ दिली. पण आता आमची इच्छा आहे की, मनपात शिवसेनेचाच महापौर बसावा, जो कोणी आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आमचे समर्थन राहील,’ अशी ठाम भूमिका घेतली असल्याचे शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
Maharashtra TimesSharmila Thackeray : आमचे सगळे नगरसेवक चोरुन नेले होते… शर्मिला ठाकरेंनी खंत मांडली; उद्धव, रश्मी आणि राज… तिघांची नावं घेत म्हणाल्या…
‘आमच्या गटाला साथ दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल, तेव्हा मोठ्या मनाने काँग्रेसने आमची इच्छा पूर्ण करावी. मनपातील उर्वरित पदांसाठी फारसा आग्रह धरणार नाही,’ अशीही पुष्टी गिऱ्हे यांनी जोडली.

आम्ही हरलो नाही, तोडीस तोड उत्तर दिलंय; पराजयानंतरही उद्धव ठाकरेंना दांडगा विश्वास

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा