Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील उद्योग पळवून ते गुजरातला नेले जात आहेत. मना-मनात राम म्हणणाऱ्यांनी मंदिर बांधले, पण आता तिथेही लूट सुरू आहे,’ असे ठाकरे या वेळी म्हणाले.

मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, ‘कालपासून आपण ज्या सभा घेत आहोत, त्या मुळात राजकीय सभा नाहीतच. माझ्या शिवसैनिकांसोबतच्या या कौटुंबिक भेटी आहेत. ही सगळी माझी हक्काची माणसे आहेत . मला ओमराजे पाहिजे होता; तर त्यांना खासदार पाहिजे होता. मी शेवटपर्यंत समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी गद्दारी केली . देशात आणि राज्यात आज लोकशाहीचे मूल्य हरवत चालले असून, खासदारांना विकत घेऊन पक्ष फोडण्याची अराजकता माजवली जात आहे.’
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भरसभेत व्हिडिओ दाखवला, आईला धोका दिल्याचा आरोप; आता बंडखोर खासदाराचा पलटवार; काय म्हणाले?
‘बहुमत असतानाही पक्ष आणि चिन्ह पळवण्यात आले. मराठी माणसाची अस्मिता जपणारी शिवसेना आणि महाराष्ट्र धर्म संपवण्याचे षडयंत्र केंद्रातील सत्ताधारी करीत आहेत. मेळाव्याला खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, युवा नेते आदित्य ठाकरे, जिल्हा संपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, अंबादास दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी घातल्या पिंपळाला 108 उलट्या प्रदक्षिणा, महाराष्ट्रात एकच चर्चा
हे तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’
परभणी : उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोलताना हे ‘ऑपरेशन टायगर’ नव्हे; तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस‘ आहे, असे संबोधित मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांचे पंख छाटून त्यांना बाजूला केले, कारण ते दिल्लीच्या शर्यतीत येऊ शकत होते . आता तीच वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली असून पंतप्रधान पदाच्या शर्यती ते येऊ नयेत म्हणून त्यांचेही पंख कापण्याचे काम सुरू आहे. यातून फडणवीस यांचा आत्मविश्वास ढळत चालला असून ते हतबल झाल्याचे निरीक्षण ठाकरे यांनी नोंदविले.

