Headlines

Tukaram Mundhe Gets an Unexpected Complaint About Tobacco Tooth Powder From a Child Video Viral | ‘मुंढे साहेब, त्या मशेरीकडेही लक्ष द्या, बायका बुकणा भरतात अन् गावाची मापं काढतात’; चिमुकल्याची FDA कडे मागणी, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही


Tobacco Tooth Powder: अन्नभेसळीविरोधातील कारवाईमुळे चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढेंकडे एका लहान मुलानं मजेशीर मागणी केली आहे. तो महिलांची मशेरी बंद करण्याची मागणी करतोय. हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटकरीसुद्धा त्यावर एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

Tukaram Mundhe
(फोटो सौजन्य – namdev.patil.5015/Instagram)
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या खूपच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर धडाधड कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सामान्य जनता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. याच पार्श्वभूमीवर एका लहान मुलाचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. त्यानं मुंढेंना तोंडाला लावायची मशेरी बंद करण्याची विनंती केली आहे. तो म्हणतोय, महिला तोंडामध्ये मशेरी भरतात आणि गावभर लोकांची मापं काढत फिरतात. वास्तविक, हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. त्यामुळे नेटकरी देखील अत्यंत मजेशीर शैलीत त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

मिसरी लावतात आणि मापं काढतात

​ ​

हा व्हिडीओ namdev.patil.5015 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. “तुकाराम मुंढे साहेब… त्या मिसरीकडे सुद्धा लक्ष द्या. अहो, बायका तोंडामध्ये बुकणा भरतात मिसरीचा आणि मग सगळ्या गावाची मापं काढत बसतात,” अशी मजेशीर विनंती या चिमुकल्यानं आयुक्तांना केली आहे.

तंबाखू भाजून त्याची पावडर तयार केली जाते आणि मग या पावडरचा वापर दात घासण्यासाठी केला जातो. या पावडरला गावाकडच्या भाषेत मशेरी किंवा मिसरी असं म्हणतात. खेडेगावांतील काही लोक किंवा वृद्ध मंडळी टूथपेस्टऐवजी मशेरीनं दात घासतात. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांनी दात घासणं हे शरीरासाठी योग्य नाही. त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतात.

नेटकरी देताहेत अशा प्रतिक्रिया

​ ​

या अवघ्या ३० सेकंदांच्या व्हिडीओवर आतापर्यंत ४ हजारांहून अधिक प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. कोणी म्हणतंय, “मुंढे साहेब, या मुलाच्या तक्रारीकडे तातडीनं लक्ष द्या.” तर कोणी म्हणतंय, “बाळा, उगाच नको ती तक्रार करू नकोस. गावातील बायका लाटणं घेऊन तुझ्या मागे लागतील.” असो, पण तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर तुमचं काय मत आहे? आणि मुलाची ही तक्रार तुम्हाला कशी वाटली? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा