Headlines

Tragic end of three lives in kolhapur family 25 year old mother takes life of two little children; घरात प्रवेश करताच दिराच्या पायाखालची वाळू सरकली; २५ वर्षीय विवाहितेच्या कृतीने समाजमन सुन्न


कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या मच्छी मार्केट परिसरात एका 25 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यांना मृत्यूच्या विळख्यात ढकलून स्वतःही आपले जीवन संपवले. आईनेच आपल्या पोटच्या दोन निष्पाप फुलांसारख्या जीवांचा गळा आवळल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून मोठी हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

एकाच घरातील तीन जीवांचा अंत..

शनिवारी रात्री उघडकीस आलेल्या या भीषण घटनेने गाडीवडर कुटुंबाचा सुखी संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. मृत मातेचे नाव संगीता राजू गाडीवडर (वय 25) असे असून, तिने 4 वर्षांची मुलगी प्रगती राजू गाडीवडर आणि अवघ्या दीड वर्षाचा मुलगा प्रतीक राजू गाडीवडर यांना गळफास देऊन स्वतःही गळफास घेतला. एकाच वेळी घरातील तीन व्यक्तींच्या मृत्यूमुळे परिसरात तणाव पसरला आहे.

असा उघडकीस आला हृदयद्रावक प्रकार

ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत मुलांचे काका दत्ता गाडीवडर हे सायंकाळी 5 च्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दत्ता यांनी बराच वेळ घराची कडी वाजवून आणि हाक मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरातील मुलेही बाहेर खेळताना दिसत नसल्याने त्यांचा संशय बळावला. अखेर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रगती आणि प्रतीक या चिमुरड्यांनी ओढणीच्या साहाय्याने, तर संगीता यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे विदारक दृश्य तिथे पाहायला मिळाले.

कौटुंबिक कलह ठरला आत्महत्येचे कारण?

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण कृत्यामागे कौटुंबिक कलह असण्याची शक्यता आहे. घटनेच्या दिवशी दुपारी संगीता आणि त्यांच्या पतीमध्ये काही घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला होता. याच वादातून किंवा मानसिक तणावातून संगीता यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके आणि ठोस कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नातेवाईकांची गर्दी आणि पुढील तपास..

रात्री उशिरा तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. या हृदयद्रावक घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच आरोग्य केंद्राबाहेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, आईच्या एका क्षणाच्या टोकाच्या निर्णयामुळे दोन निष्पाप मुलांचा बळी गेल्याने समाजमनातून संताप आणि दुःख व्यक्त होत आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत