Mugdha Shah : अभिनेत्री मुग्धा शाह यांनी बालपणी खूप त्रास सहन केला आहे. अभिनेत्रीला सावत्र आईनं खूप दिला, त्यामुळे सावत्र आईच्या जाचाला कंटाळून मुग्धा यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला. मात्र, एका मैत्रिणीमुळे अभिनेत्रीचा जीव वाचला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री मुग्धा शाह यांनी आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मुग्धा शाह यांनी प्रोफेशनल आयुष्यात यश मिळवलं. मात्र, त्यांना वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागलेला. मुग्धा शाह यांनी लहानपणापासूनच खूप त्रास सहन केला आहे. सावत्र आईनं अभिनेत्रीचा खूप छळ केलेला. याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय.
मुग्धा शाह यांनी सांगितला कठीण काळ
मुलाखतीदरम्यान मुग्धा शाह म्हणाल्या की, ‘लहानपणी कधी तरी आम्ही एकत्र जेवायला बसायचो. मला भूक लागलेली असेल आणि मी जास्त चपाती घ्यायला गेले तर माझी सावत्र आई माझ्याकडे रागाने बघायची. मग मी ती तशीच ठेवायचे. कधी-कधी मग माझे बाबा स्वतः जास्त चपात्या घ्यायचे आणि मग मुद्दाम जास्त झाली म्हणून ही तुला घे म्हणत माझ्याकडे फेकायचे.’
Aayush Bhide : ‘तो खूप वाईट काळ होता’, करोनात आई-वडिल गेले, न खचता आयुषनं पूर्ण केलं बाबांचं स्वप्न, सांगितला कठीण काळ ‘माझं लग्न बाबांनीच करून दिलेलं. कारण, त्यांचं असं होतं लग्नाचा खर्च मी करणार नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, कुणी फुकट घेऊन जात असेल तर जाऊद्या. आपल्याकडे आते भावासोबत लग्न करण्याची पद्धत असते. तेव्हा माझ्या आत्याने माझ्या आईला सांगितलेलं, ‘तुला मुलगी झाली तर मीच तिला माझी सून करून घेईन’ पण, माझी आई वारली. नंतर आत्या बाबांना सांगायची. माझ्याही मनात तेच होतं, माझं लग्न ठरलेलं आहे.’
‘मुग्धा शाह पुढे म्हणाल्या की, माझी आठवी झाल्यानंतर माझ्या सावत्र आईला प्रॉब्लेम व्हायला लागले. तेव्हा माझ्या बाबांनी मला आश्रमात पाठवायचं ठरवलं. पण, त्यावेळी आत्या म्हणाली, ‘मी तिला माझ्याकडे घेऊन जाते’ मीसुद्धा विचार केला, लग्नानंतर आपल्याला त्याच घरात जायचंय. पण, दोन वर्षांनी आत्यानं मला पुन्हा बाबांच्या घरी आणून सोडलं. माझा पुन्हा त्रास सुरू झाला. आत्याच्या मुलासोबत लग्न ठरलेलं, त्याची गर्लफ्रेंड होती, त्यामुळे त्यानं तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला त्याचा खूप मोठा धक्का बसला. मी सकाळची सगळी कामं करून नाईट कॉलेजला जायचे. तेव्हा असंच कॉलेजमधून येताना मी बोरिवली-विरार फास्ट ट्रेनमध्ये चढले. मालाड यायच्या आधीच मी ट्रेनमधून उडी मारली. आयुष्याला कंटाळल्यामुळे मी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला.’
‘पण, माझी एक मैत्रीण होती. तिला समजताच ती लगेच रिक्षावाल्याला घेऊन आली, मला घरी सोडलं, माझ्यासोबत थांबलेली. मी रेल्वे ट्रॅकवरच होते, मागून ट्रेन आली असती आणि माझ्यावरून गेली असती, तरी कुणालाच कळलं नसतं. ती माझी मैत्रीण माझ्या आयुष्याचा खूप मोठा हिस्सा आहे.’ असं मुग्धा यांनी शेवटी सांगितलं. ‘लोकमत सखी’ला दिलेल्या मुलाखतीत मुग्धा शाह बोलत होत्या.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा