Headlines

Karn Sharma Retirement : विराट कोहलीसोबत पदार्पण, कॅप नंबर ‘२८३’चा १९ वर्षांनी क्रिकेटला अलविदा; सलग ३ आयपीएल ट्रॉफी जिंकणारा खेळाडू नेमका कोण?


Indian Cricketer Retirement News : विराट कोहलीच्या कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या क्रिकेटरने त्याच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला. सलग तीन आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या या लेगस्पिनरची कारकीर्द मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मर्यादित राहिली.

Karn Sharma Retirement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेटमधून आणखी एका अनुभवी खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर या खेळाडूने वयाच्या ३८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटला रामराम ठोकला. यूपी टी२० लीगदरम्यान निवृत्तीची घोषणा करत त्याने आपल्या क्रिकेट प्रवासाला पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे, या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नसली, तरी त्याच्या पदार्पणाची वेळ मात्र खास होती. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडिलेड कसोटीतून त्याने टीम इंडियात पदार्पण केले होते. हा सामना विराट कोहलीचा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. त्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत.

हा खेळाडू म्हणजे भारताचा माजी लेगस्पिनर कर्ण शर्मा . त्याने भारतासाठी फक्त १ कसोटी, २ वनडे आणि १ टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या चार सामन्यांत त्याच्या नावावर ५ विकेट्स आणि ८ धावा आहेत. इएसपीएन क्रिकइन्फोने त्याच्या निवृत्तीबद्दलचे वृत्त दिले आहे.

Maharashtra TimesIND vs SL Playing 11 : भारताचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय, टीममध्ये एकमेव बदल; ३३ वर्षी खेळाडू करणार पदार्पण, पाहा कोण

karn Sharma News
कर्ण शर्मा (इंडियन क्रिकेटर)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमी, पण IPLमध्ये मोठा पराक्रम

टीम इंडियासाठी मर्यादित सामने खेळलेल्या कर्ण शर्माने आयपीएलमध्ये मात्र आपली वेगळी ओळख निर्माण केली. सलग तीन हंगाम आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद, २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स आणि २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने सलग तीन वर्षे विजेतेपदाचा आनंद घेतला. आयपीएलमध्ये त्याने ९० सामने खेळताना ८३ विकेट्स घेतल्या. २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याने आपला अखेरचा आयपीएल सामना खेळला.

१९ वर्षांचा प्रवास अखेर थांबला

दरम्यान, २००७ मध्ये रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कर्णने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ९७ सामन्यांत २७० विकेट्स घेतल्या. फलंदाजीतही त्याने दोन शतकांसह २,८६६ धावा केल्या. निवृत्तीची घोषणा करताना कर्णने त्याचे कुटुंबीय, बीसीसीआय, रेल्वे, यूपीसीए, आंध्र आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले. पुढील काळात कोचिंग आणि क्रिकेटशी संबंधित इतर जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा