Toxic Teaser : सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यावर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कन्नड सुपरस्टार यश गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आगामी ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अलीकडेच, निर्मात्यांनी ‘टॉक्सिक’चा सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला. हा टीझर केवळ चित्रपटातील महिला कलाकारांना दाखवण्यासाठी होता.
एका युझरने लिहिलं, ‘मला विश्वासच बसत नाही की, हा चित्रपट एका महिलेनं लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट केवळ पुरुषी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बनवला आहे.’ दुसऱ्यानं लिहिलं, ‘एका महिलेने असा चित्रपट दिग्दर्शित केला आहे यावर माझा विश्वासच बसत नाही.’ त्याचबरोबर इतर नेटकऱ्यांनी, ‘माफ करा, पण ‘टॉक्सिक’चा नवीन टीझर खूपच वाईट आहे.’, ”धुरंधर’सारख्या चित्रपटांनी भारताला अभिमान वाटतोय, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी अजूनही महिलांना वाईटरित्या चित्रित करत आहे.’ अशा कमेंट्स इतर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
‘मला ‘टॉक्सिक’चा टीझर आवडला नाही. संवाद स्त्रीचा द्वेष करणारे आहेत. सिनेमात ॲक्शन उत्तम असेल, पण कथा खूप गुंतागुंतीची वाटते.’ ‘स्त्रियांना विचित्रपणे चित्रित करण्यात आलं आहे’, ‘कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीनं हा अश्लील चित्रपट पाहू नये आणि स्त्रियांचा आदर करणाऱ्या कोणत्याही पुरुषानं या चित्रपटावर बहिष्कार टाकावा.’असं काहींचं म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर कोणीतरी सिनेमाला महिलांचा अपमान म्हटलंय आणि असा सिनेमा कधीच स्वीकारला जाऊ नये, असंही म्हटलं आहे.
Celebrity Corner : धर्मवीरमधले राज ठाकरे ते लक्ष्मी निवासचा विश्वा, गोव्याच्या अनुज प्रभू सोबत गप्पा
‘टॉक्सिक’ कधी प्रदर्शित होईल?
‘टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स’ हा या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा सिनेमा २६ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गीतू मोहनदास या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत आणि त्यांनीच कथाही लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती व्यंकट के यांनी केली आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा