Headlines

Thane Bhiwandi TET Paper Leak Case Tomorrow Paper Cancelled Three Accused in Police Custody Main Accused Absconding; टीईटी पेपरफुटी प्रकरण; पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात, आरोपींबाबत मोठी माहिती समोर; दीड कोटींना विक्रीची ऑफर


TET Paper Leak Case Police Press Conference : टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणावर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत मोठी माहिती दिली आहे.

TET Paper Leak Case Police Press Conference
टीईटी पेपरफुटी प्रकरण तीन आरोपी ताब्यात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे (भिवंडी) : उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नीटचा पेपर फुटल्यानं संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या नीट परिक्षेच्या पेपरफुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्र खळबळ उडाली आहे. तसेच टीईटीचा पेपर फुटल्यानंतर देशभरातून आता विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याकरिता आयोजित केली जाणारी एक राज्यस्तरीय परीक्षा आहे.

पत्रकार परिषदेत पोलिसांनी काय माहिती दिली?

उद्या होणाऱ्या टीईटी पेपरफुटी प्रकरणी भिवंडी पोलिसांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत मोठी माहिती दिली आहे. ‘टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परिक्षेचे पेपर सापडले आणि ते आम्ही जप्त केले आहेत. पेपर विकणारे जे आरोपी होते त्यांना आम्ही ट्रॅप लावून पकडलंय’, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
Maharashtra TimesMAHA TET Exam Cancelled: सर्वात मोठी बातमी! ‘टीईटी’चा पेपर फुटला, रविवारी होणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ अचानक रद्द
पुढे ते म्हणाले की, ‘आरोपींची दीड कोंटींची मागणी होती आणि ॲडव्हान्समध्ये त्यांना काही पैसे हवे होते, असं चौकशीत समोर आलं आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य बघता वरिष्ठांच्या आदेशाने एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. तपास पथकाचे मुख्य अधिकारी म्हणून डी.सी.पी पवन बनसोड आहेत. तसेच या पथकामध्ये दोन ए.सी.पी आणि नऊ पी.आय, ए.पी.आय आणि बाकी इतर कर्मचारी मिळून 20 कर्मचाऱ्यांचं हे विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे. पुढील तपासासाठी विविध ठिकाणी आमचे तपास पथकं रवाना झाले आहेत. यामध्ये सखोल तपास करण्यात येईल. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोरता कठोर कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती देखील भिवंडी पोलिसांनी दिली आहे.

मुख्ख आरोपी फरार

पोलीस पुढे काय म्हणाले, ‘हे पेपर इतर ठिकाणी देखील विकले गेले असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुख्य आरोपी पकडल्यानंतर सर्व प्रकरणाचा खुलासा होईल. सर्व शक्यता गृहीत धरुन हा तपास सुरु केलेला आहे. या प्रकरणात कुणाकुणाचा समावेश आहे? पेपर कुठे-कुठे विक्री केलेले आहेत? या सर्व अनुषंगाने आमचा तपास सुरु आहे. मात्र, या प्रकरणातला मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आमच्या ताब्यात आता तीन आरोपी आहेत. त्यातला एक हरियाणाचा आहे तर दोनजण बिहारमधील आहेत. एकंदरीत आतापर्यंत केलेल्या तपासात ही माहिती समोर आली की, ते सर्व दिल्लीवरुन आले होते. पण त्यांना कुठून पेपर मिळाला? त्यांनी हा पेपर कसा प्राप्त केला? हा सर्व तपास आम्ही करत आहोत. आरोपींकडे उद्याच्या टीईटी पेपरच्या चार वेगवेगळ्या कॉपी मिळाल्या आहेत’. राजीव श्रीप्रयाग शाव (वय 45), आकाश कुमार स्वराज कुमार (वय 30) आणि धीरज बलराज सिंग (वय 28) असं आरोपींची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra TimesEknath Shinde: फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित विमान प्रवास; शिंदेंनी मोजक्या शब्दांत घेतला समाचार, काय म्हणाले?

टीईटीची फेरपरीक्षा कधी होणार?

टीईटीचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ‘पेपर फुटीनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे, याचं नियोजन लवकर कळवू, असं प्रिया शिंदे यांनी सांगितलं’. ‘जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सदर प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते’, असं प्रिया शिंदे म्हणाल्या. ‘तसेच महाराष्ट्रातील 6 लाख 128 शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. 6 लाख 126 परिक्षार्थींकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल’, अशी माहिती प्रिया शिंदे यांनी दिली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा