Headlines

Thalapathy Vijay : NEET पूर्णपणे रद्द करा! CJP आंदोलनादरम्यान थलपती विजय यांची मोठी मागणी, राहुल गांधीबद्दल काय म्हणाले?


Thalapathy Vijay : सीजेपी आंदोलनादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठी मागणी केली आहे.

Thalapathy Vijay Demands Abolish NEET Exam
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी केंद्र सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. थलपती विजय यांनी म्हटलं आहे की, नीट (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करावी. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आंदोलनावरही मुख्यमंत्री थलपती विजय यांनी प्रतिक्रिया दिली.

थलपती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘नीट (NEET) परीक्षा लागू झाल्यापासून, केवळ त्या परीक्षेची विश्वासार्हता कमी झाली नाही, तर विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.’

Rahul Gandhi ना उचलणं ही BJP ची चूक? Dharmendra Pradhan पहिल्यांदाच बोलले, Thalapathy Vijay ची Entry

नीट (NEET) पूर्णपणे रद्द करावी – टीव्हीके (TVK)

टीव्हीके (TVK) नं म्हटलं आहे की, नीट (NEET) परीक्षेमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना होणारं नुकसान कधीही न संपणारं आहे. त्यामुळे, आम्ही केंद्र सरकारकडे नीट (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करतो.

Thalapathy Vijay Post

राहुल गांधींच्या अटकेबद्दल मुख्यमंत्री विजय काय म्हणाले?

पंतप्रधानांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत असताना राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं टीव्हीकेनं म्हटलं आहे. टीव्हीकेने पुढे लिहिलं की, ‘दिल्लीतील युवा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी फरफटत नेऊन हातकड्या घालणं, हा लोकशाहीच्या हक्कांवर झालेला एक हल्ला आहे. हे अत्यंत निंदनीय आहे.’
Maharashtra TimesAamir Khan Brother Hyder Ali Khan : आमिर खानचा सावत्र भाऊ; राहायला घर नाही, खायला अन्न नाही, मित्र पाजतात गावठी दारू; एक्स पत्नीचा खुलासा

काय घडलं नेमकं?

नीट पेपरफुटीचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईवरून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केलं. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) खासदार सुप्रिया सुळे नंतर या आंदोलनात सामील झाल्या. विरोधी पक्षनेत्यांना घटनास्थळावरून जबरदस्तीनं हटवण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.