Headlines

Delhi Chole Kulche Vendor Claims 2 Lakh Monthly Income Video Viral | दिवसाला किती पैसे कमावतोस? रस्त्यावर छोले-कुल्छे विकणाऱ्या तरुणाची कमाई वर्षाला ३० लाख, लोक म्हणताहेत, ‘बिझनेस पार्टनर बनव’


Street Food Business India: फुटपाथवर छोले-कुल्छे विकणाऱ्या एका विक्रेत्याने दिवसाला सुमारे ५ हजार रुपये, म्हणजेच महिन्याला जवळपास २.५ लाख रुपये कमावत असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अचंबित व्हाल.

Chole Kulche Seller Income
(फोटो सौजन्य – bykomal_raw/Instagram)
एक काळ होता, जेव्हा कॉर्पोरेट नोकऱ्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जायच्या. लोक मोठ्या ऐटीत आपल्या कंपनीचं नाव सांगायचे. पण आता रस्त्यावर काम करणारा मजूर आणि कॉर्पोरेट कर्मचारी यांच्यामध्ये फारसा फरक उरला नाही, असं वाटतं. कारण त्यांच्या कामाला ना पूर्वीसारखा स्टेटस राहिला आहे, ना समाधानकारक पगार मिळतो. याच पार्श्वभूमीवर फुटपाथवर छोले-कुल्छे विकणाऱ्या एका विक्रेत्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याची महिन्याची कमाई ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. कारण तो महिन्याला जवळपास २.५ लाख रुपयांचा नफा कमावत असल्याचा दावा करतो.

खरंच २.५ लाख रुपये कमावतो?

खरंच २.५ लाख रुपये कमावतो?

हा व्हिडीओ bykomal_raw या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने फुटपाथवर छोले-कुल्छे विकणाऱ्या विक्रेत्याला त्याची रोजची कमाई विचारली. यावर क्षणाचाही विलंब न करता त्याने ५ हजार रुपये असं उत्तर दिलं. त्यानंतर महिलेने महिन्याचा हिशोब लावला. त्यानुसार तो साधारण २.५ लाख रुपये महिन्याला कमावत असल्याचं समोर आलं. म्हणजेच वर्षाला जवळपास ३० लाख रुपये कमाई होते.

शेवटी महिला गंमतीने म्हणते, “तुला माझा पगार किती आहे हे सांगू का?” यावर विक्रेता होकार देतो. मात्र, महिला म्हणते, “राहू दे, सांगण्यासारखं नाही.” त्यानंतर ती मजेशीर अंदाजात म्हणते, “मलाही तुझी बिझनेस पार्टनर बनव. मला सुद्धा छोले-कुल्छे चांगले बनवता येतात.”
(फोटो सौजन्य – Muhammad Khawar Nazir/pexels.com)

नेटकरी झाले अचंबित

​ ​

हा व्हिडीओ ११ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच अनेक जण त्याचं उत्पन्न ऐकून अचंबित झाले आहेत. मात्र, जर हा तरुण खरंच वर्षाला २५ ते ३० लाख रुपये कमावत असेल, तर ही बाब निश्चितच आश्चर्यकारक आहे. कारण मोठमोठ्या पदव्या घेऊन, परदेशात शिक्षण पूर्ण केलेल्या अनेकांना देखील कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये एवढा पगार मिळत नाही. असो, तुम्ही तुमच्या पगाराची तुलना या तरुणाच्या कमाईशी करा आणि या प्रकरणी तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा