Headlines

हे आंदोलन हाच योग्य मार्ग, पण याचं राजकारण नको…CJP च्या आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा, पोस्ट चर्चेत


मुंबई: दिल्लीत जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अभिनेता सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट शेअर करत आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आपण विद्यार्थ्यांच्यासोबत असल्याचं त्यानं सांगितलंय.

सलमान खाननं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि तरुण पिढीचा आवाज ऐकून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केलं आहे. विद्यार्थ्यांच्या या शांततापूर्ण संघर्षात त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज असल्याचंही त्यानं म्हटलंय.

काय म्हटलंय सलमान खाननं त्याच्या पोस्टमध्ये?
ही एक अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती; तिला हिंसक वळण लागलं याचं खूप दुःख वाटतंय. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुखापत झाली, त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते. प्रश्नपत्रिका फुटणं (पेपर लीक) ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. आपल्या देशातील मुले एका चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून मला बरं वाटतंय.

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करून स्वतःचं भविष्य घडवण्याची तसंच एक महान व सुशिक्षित भारत निर्माण करण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेनं केलं आहे. ते खरोखरच धैर्यवान आणि शूर आहेत. शिक्षणाप्रती समर्पित आणि प्रेरित असलेली ही पिढी भारताचा नक्कीच गौरव वाढवेल.

Maharashtra TimesAyesha Khan : ‘महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मला जबरदस्तीनं व्हॅनमध्ये ओढलं’, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानला पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, काय घडलं?
हा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातील आहे; याचं राजकारण केलं जाऊ नये. याचं संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच दिलं पाहिजे. मला खात्री आहे की सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करेल. ही सर्वांसाठीच फायदेशीर अशी स्थिती आहे. सकारात्मक निर्णयाची आशा आणि प्रार्थना करतो.

शिक्षण हीच पुढची ‘ट्रेंड’ आणि ‘फॅशन’ बनली पाहिजे आणि ती दरवर्षी अधिक लोकप्रिय व आकर्षक झाली पाहिजे; इतकी की परदेशातून लोक शिक्षणासाठी भारतात येतील आणि भारत एक ‘एज्युकेशनल हब’ (शिक्षणाचे प्रमुख केंद्र) बनेल.

सलमाननं या पोस्टमध्ये सीजेपी किंवा कोणत्याही पक्षाचा उल्लेख न करत केवळ विद्यार्थ्यांना पाठिंबा असल्याचं नमूद केलंय.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सलमानने ही पोस्ट शेअर करताच काही मिनिटांतच ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. लाखो चाहत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी या पोस्टवर कमेंट करत सलमान खानच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. “तरुणांचा आवाज उठवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘भाईजान’ पुढे आला,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Maharashtra TimesManoj Muntashir : ‘CJP आंदोलक विद्यार्थी हे देशद्रोही,पूर्ण जबाबदारीनेच बोलतोय’, बॉलिवूडमधील लेखकाचे वक्तव्य, नेटकऱ्यांचा संताप
नेमकंकाय घडलंय?
गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा व्हावी, NEET पारदर्शकतेसाठी CJP च्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जंतर-मंतरसह देशातील विविध भागांत विद्यार्थ्यांचे हे आंदोलन तीव्र होत चाललं आहे.

सलमान खानपूर्वी सोनू सूद, प्रकाश राज, शबाना आझमी, आणि सोहा अली खान यांसारख्या अनेक प्रमुख कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, सलमान खानसारख्या बड्या स्टारनं यावर थेट भूमिका घेतल्याने या आंदोलनाला अधिक व्यापक ओळख आणि वजन प्राप्त झालं आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत