Headlines

Thackeray Sena demands cancellation of MLA status of santosh bangar; मतदान गोपनीयतेचा भंग करणाऱ्या संतोष बांगरांविरुद्ध ठाकरे सेना आक्रमक, आमदारकी रद्द करण्याची आयोगाकडे मागणी…


हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेला आणि मतदारांना चिन्हाबद्दल सांगून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केला आहे, यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हाय़रल झाला आहे.

Thackeray shivsena on santosh bangar voting breach
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर मतदान केंद्रावर मोबाईल नेऊन आणि एका महिलेला मतदान चिन्ह सांगून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी बांगर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

नेमके काय घडले, याबद्दल बोलायचं झाल्यास, आमदार संतोष बांगर हे हिंगोली नगरपालिकेसाठी जिल्हा परिषदेच्या कन्या शाळा मंगळवारा येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. तिथे त्यांनी मतदान कक्षात एका महिलेला मतदान चिन्ह सांगितले. यामुळे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला. एवढेच नाही, तर मतदान केंद्रात मोबाईल घेऊन घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Timesस्थानिक निवडणूक नियोजनातल्या गोंधळावर नाना पटोलेंचा संताप, आयुक्तांविरोधात महाभियोगाची केली मागणी, म्हणाले, ‘.. तर आयोगाच्या मागे सरकारच ‘

या घटनेनंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे एक मोठी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी. देशमुख यांनी बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संदेश देशमुख म्हणाले की, “बांगर यांनी हिंगोली जिल्ह्याचा बिहार करून ठेवला आहे. निवडणूक आयोग जिवंत असेल तर बांगर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची आमदारकी रद्द करावी.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, आमदार संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा नाही, तर आचारसंहितेचा भंग केला आहे. ते दंडुकेशाही आणि दडपशाहीच्या माध्यमातून हातात मोबाईल घेऊन घोषणा देत होते. मतदारांना एका विशिष्ट चिन्हावर मतदान करण्यास सांगत होते. त्यामुळे संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणी देशमुख यांनी केली.

देशमुख यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून म्हटले की, “निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कार्यवाही करेल. बूथ वरील सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे आणि पोलिसांना देखील निलंबित केलं पाहिजे.” यासोबतच, देशमुख यांनी एकनाथ शिंदे गटावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एकनाथ शिंदे यांचं संतोष बांगर यांना समर्थन आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा