Headlines

Talathi Recruitment Scam: छ.संभाजीनगरात बोगस तलाठी भरतीचा पर्दाफाश, दोघांची 41 लाख रुपयांची फसवणूक; बनावट नियुक्तीपत्र, प्रशिक्षणही दिलं, प्रकरण काय? – fake talathi recruitment racket busted in chhatrapati sambhajinagar 2 job seekers duped of rs 41 lakh


म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: तलाठी भरतीच्या नावाखाली दोन जणांची ४१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे व टॅब देऊन युवकांना तलाठी कामकाजाचे प्रशिक्षणही दिले. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात बाबासाहेब हरबक व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्ट २०२६दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसील कार्यालय परिसरात हा प्रकार घडला. आरोपींनी आणखी बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

जिल्ह्यात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदाची कोणतीही भरती सुरू नसतानाही अज्ञात व्यक्तींकडून निवड झाल्याचे सांगून फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पोलिसांना चौकशीसाठी पत्र दिले होते.

Maharashtra TimesEknath Shinde : धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?दरम्यान, दोन जणांनी १३ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी महसूल अधिकारी अनिल भगत यांना पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी अधिकृत केले.

तक्रारीनुसार, अजिनाथ ज्ञानेश्वर वरकड यांच्या पत्नीला तलाठी पदावरील नियुक्तीचा आदेश १० ऑगस्ट रोजी rdcchsngr@gmail.com या बनावट ई-मेलवरून पाठविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पडताळणी केल्यानंतर तो आदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

आरोपींनी २४ फेब्रुवारीपासून सुभेदारी विश्रामगृह, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीत आठवड्यातून तीन दिवस प्रशिक्षण घेतले. पुणे व कोल्हापूरहून प्रशिक्षक येत असल्याचे सांगण्यात आले. महसूल संगणकीय कामकाजासाठी तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या बनावट स्वाक्षरीची पत्रेही देण्यात आली. तक्रारीनुसार, अजिनाथ यांनी पत्नीच्या नियुक्तीसाठी ऑनलाइन साडेसहा लाख आणि रोख सात लाख, असे एकूण १३ लाख ५० हजार रुपये दिले. तसेच अक्षय गायकवाड यांच्या भावाकडून २८ लाख रुपये उकळण्यात आले.

Maharashtra TimesMaratha Reservation : मराठवाड्यात किती मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप? महत्त्वाची आकडेवारी समोरव्याप्ती वाढण्याची शक्यता

अर्जदारांसोबत अन्य काही व्यक्तींनाही अशाच प्रकारे तलाठी पदाचे नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत. आरोपींच्या या टोळीने आणखी किती जणांकडून पैसे उकळले, याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बनावट सही-शिक्के
कार्यालयीन अभिलेखांशी पडताळणी केली असता नियुक्ती आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत