![]()
Mumbai News : नार्वेकर, शिंदे, कोकाटे ते दानवे… मनपा इंजिनिअर्सच्या बदली-पदोन्नतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिफारशी, माहिती अधिकारात ‘फील्डिंग’ उघड
मुंबई महापालिकेतील १२२ सहाय्यक व दुय्यम अभियंत्यांच्या ऑनलाइन परीक्षेआधीच ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या बदल्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांची बदली करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात राज्य सरकारमधील मंत्री, आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून महापालिकेतील अभियंत्यांच्या पदोन्नती, पदस्थापना आणि बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात शिफारशी होत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
