Sunny Deol On Fight With Shah Rukh Khan : सनी देओल आणि शाहरुख खान यांचं ‘डर’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान भांडण झालेलं. याबद्दल अभिनेत्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सनी देओल नं आपल्या करिअरमध्ये अनेक यशस्वी भूमिका साकारल्या आहेत. पण अभिनेत्याचा १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘डर’ हा चित्रपट खूप चर्चेत राहिला. शाहरुख खानच्या भूमिकेमुळे सनी देओल नाराज होता, कारण त्याच्या भूमिकेला पुरेसं महत्त्व मिळत नव्हतं. मात्र, सनी देओलनं यावर भाष्य केलं आहे. सनी देओलनं सांगितलं की, ‘डर’च्या शुटिंगदरम्यान तो कोणत्याही कारणावरून शाहरुख खानवर रागावला नव्हता, तर इन्सिक्योरिटीमुळे रागावला होता. इतकंच नाही, तर त्यानं असंही म्हटलं की त्यावेळी शाहरुख खान त्याचा मित्र नव्हता.
शाहरुखबद्दल काय म्हणाला सनी देओल?
सनी देओल आणि शाहरुख खान यांच्या १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर’ चित्रपटाची चर्चा होते, तेव्हा त्यांच्यातील वादाचा उल्लेख नेहमीच केला जातो. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एका सीनवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. परिस्थिती इतकी चिघळली की, सनी देओलनं आपली जीन्ससुद्धा फाडली होती. जवळपास १६ वर्षे ते दोघे एकमेकांशी बोलले नाहीत. पण २०२३ मध्ये ‘गदर २’ च्या यशानं हे अंतर मिटलं. याच सिनेमानंतर शाहरुख खान आणि सनी देओल एकमेकांसोबत बोलायला लागले.
पहिल्याच दिवशी दिग्दर्शकाशी पंगा, दातांना चॉकलेट लावून हॉरर सीन; पौर्णिमेचा फेरा 3 शूटिंगचे किस्से
शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला की, ‘डर’च्या शूटिंगदरम्यान झालेल्या वादानंतर त्यानं रागाच्या भरात आपली जीन्स फाडली होती. सनी देओल म्हणाला की, ‘मी रागावलो नव्हते. मी माझी जीन्स फाडली कारण मी खूप रागावलो होतो. अशा गोष्टी तरुण वयात दोन व्यक्तींमध्ये घडतात. पण, मी कधीच तसा नव्हतो. मी इन्सिक्योरिटी व्यक्ती नाही. पण त्यामुळे अनेक कलाकार अशा गोष्टी करतात ज्यांची त्यांना गरज नसते. कारण आपण फक्त तेच पात्र साकारू शकतो जे आपण खरोखर असतो, आपण त्यापेक्षा अधिक काही असू शकत नाही. पण तरीही, अनेक कलाकारांना खूप असुरक्षित वाटतं. यामुळे वातावरण बिघडतं आणि त्यामुळे काही गोष्टी अनावश्यकपणे चुकीच्या घडतात.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा