Aruna Irani Mehmood Relationship : अरुणा इराणी आणि मेहमूद यांची लव्हस्टोरी कायम चर्चेचा विषय ठरली आहे. अरुणा यांनी एका मुलाखतीमध्ये मेहमूद यांच्यासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

मेहमूद यांच्याबद्दल काय म्हणाल्या अरुणा इराणी?
याबद्दल बोलताना अरुणा इराणी एका मुलाखतीत म्हणालेल्या की, ‘डान्स डायरेक्टर सुरेश भट्ट मला म्हणाले, तू मेहमूद यांना पटवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे, ते तुला काम मिळवून देऊ शकतात. पण तिथेही, मी मेहमूदला हो-नाही म्हणत राहिले. तरीही, त्यांनी मला काम द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक विशेष स्थान निर्माण झालं. त्यांच्यामुळे मला पैसा, प्रसिद्धी आणि नाव मिळालं आणि मी विचार केला, ‘मी या माणसाला अजून किती काळ फसवू शकेन?’ मग आम्ही मित्र झालो, आणि नंतर मित्रांपेक्षा जास्त, पण तेवढंच.’ मेहमूद आधीच विवाहित असल्यामुळे त्यांनी अरुणा इराणी यांच्यासोबत लग्न केलं नाही.
Prasad Oak : पक्ष आणि विचारधारा हा मुद्दा नव्हताच, जीव ओतून भूमिका केली, ना शिंदेंकडून त्रास, ना ठाकरेंकडून; ‘धर्मवीर’बद्दल प्रसाद ओकचं वक्तव्य
अरुणा यांनी सांगितलं की, काम मिळवण्यासाठी त्यांना खूश करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. महमूद यांनी केवळ अभिनेत्रीचं करिअर घडवलंच नाही, तर ते उद्ध्वस्तही केले. अभिनेत्री म्हणाली, ‘मी त्यांना खूश करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी खूप गरीब कुटुंबातून आले होते, त्यामुळे नाव, प्रसिद्धी आणि पैसा मी पहिल्यांदाच पाहिला.’ ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुणा इराणी बोलत होत्या.
Emraan Hashmi Grandmother Purnima : इम्रान हाश्मीची आजी होती सुप्रसिद्ध अभिनेत्री, महेश भट्ट यांच्याशीही जवळचं नातं; मधुबाला- नर्गिससोबत तुलना, अर्थिक तंगीमुळे विकावा लागलेला जमीन जुमला
मेहमूद आधीच विवाहित होते आणि त्यांना अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं. ‘मी लग्नासाठी नकार दिला आणि ते माझ्यासाठी चांगलंच झालं.’ असं अरुणा यांनी सांगितलं. अरुणा यांनी नकार देताच मेहमूद यांनी अनेक ठिकाणी आपण अरुणा इराणींशी लग्न केल्याच्या अफवा पसरवल्या. यामुळं चित्रपट निर्मात्यांनी अरुणा यांना काम देणंच बंद केलं. मेहमूद यांच्यासोबतच्या लग्नाच्या अफवांमुळे अरुणा इराणी यांचं करिअर धोक्यात आलं. तेव्हा सुप्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके त्यांच्या मदतीला धावून आले. दादा कोंडके यांनी अरुणा यांना आपल्या चित्रपटात काम दिलं आणि त्यामुळे अभिनेत्रीला पुन्हा इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
दरम्यान, मेहमूद यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ (१९७२) आणि ‘कारवाँ’ (१९७१) यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये अरुणा इराणी यांना भूमिका दिल्या. तसेच त्यांनी १९६० आणि १९७० च्या दशकातील ‘हमजोली’ (१९७०), ‘नया जमाना’ (१९७१) यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

