Use of girl for rain of money in latur case registered against 15 individuals; पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष अन् अल्पवयीन मुलीचा वापर; लातूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
Use of girl for rain of money in latur case registered against 15 individuals; पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष अन् अल्पवयीन मुलीचा वापर; लातूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
ऋषिकेश होळीकर, लातूर: पैशांचा पाऊस पाडण्याच्या विधीसाठी लक्ष्मीपूजेचे आयोजन करून त्यासाठी अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा कथित प्रयत्न उद्गगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ, उद्गीरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर १६ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी संगनमताने पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा विधी करण्याच्या तयारीत होते. या विधीसाठी आंध्र प्रदेशातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा कथित प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात फुंडलीक देवराव रूपनर, सचिन साहेबराव भोंगळे, तसेच महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पुणे परिसरातील इतर संशयितांचा समावेश आहे. काही संशयितांची पूर्ण नावे व पत्ते उपलब्ध नसल्याचेही पोलिसांच्या कागदपत्रात नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ५७७/२०२६ नोंदवण्यात आला असून, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या २०१३ च्या अधिनियमातील कलम ३(३), तसेच कलम १२ व १८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
घटनेनंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणामागे नेमका कोणता अंधश्रद्धेचा प्रकार होता, अल्पवयीन मुलीला कोणत्या उद्देशाने आणण्यात आले होते आणि या प्रकारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. विधीच्या नावाखाली पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा कथित वापर करण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा