Headlines

Success Story of Neeraj Khandelwal CoinDCX; मुंबई IITian ने अमेरिकेतली नोकरी नाकारून मातीशी नातं जोडलं, आज 20000 कोटींच्या बिझनेसचा मालक

Neeraj Khandelwal Success Story: आयआयटी-मुंबईतून पदवीधर नीरज खंडेलवाल यांनी भारताचे सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज CoinDCX सुरू करण्यासाठी परदेशातील आकर्षक नोकरीच्या संधी नाकारल्या. देशांतर्गत क्रिप्टो पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी अमेरिकेतील वार्षिक 60 लाखांच्या सॅलरी पॅकेजला नाकारून देशाच्या विकासाला प्राधान्य दिले.

Success Story of Neeraj Khandelwal CoinDCX
CoinDCX चे नीरज खंडेलवाल यांची यशोगाथा
Success Story: एका छोट्या शहरातून 20000 कोटींच्या व्यवसायाचे नेतृत्व करण्यापर्यंत नीरज खंडेलवालचा प्रवास म्हणजे दूरदृष्टी, धैर्य आणि देशभक्तीची प्रेरणादायी किस्सा आहे. IIT बॉम्बेचे पदवीधर नीरजच्या मनात नेहमीच देशाची सेवा करण्याची तीव्र इच्छा होती. अनेक तरुण जेव्हा आंतरराष्ट्रीय संधींच्या मागे धावताना नीरज यांनी भारताच्या प्रगतीत योगदान देण्याला प्राधान्य दिले.

नीरज खंडेलवाल कोण आहे?

नीरज खंडेलवाल कोण आहे?

2018 मध्ये क्रिप्टोचा जगभर विस्तार होताना सुमित गुप्ता आणि नीरज खंडेलवाल या दोघांनी CoinDCX चा पाया घातला. भारतातील सर्वसामान्यांना क्रिप्टो गुंतवणुकीचा पर्याय मिळावा या उद्देशाने दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुमितसोबत मिळून नीरज खंडेलवाल यांनी CoinDCX चा तांत्रिक आणि संरचनात्मक पाया घातला, जी सध्या भारतातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मपैकी आहे.

नीरज खंडेलवाल यांचा प्रवास

नीरज खंडेलवाल यांचा प्रवास

द फाउंडर थेसिस पॉडकास्टनुसार अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर देशाच्या विकासात थेट योगदान देण्याच्या आशेने नीरज नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला. मात्र, त्यांची ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही, आणि त्यांनी आपले लक्ष अशा नव्या क्षेत्रांकडे वळवले जिथे ते काहीतरी भरीव योगदान देऊ शकेल. जिज्ञासा आणि जिद्द यामुळेच नीरज लवकरच क्रिप्टोकरन्सी या उदयोन्मुख क्षेत्राकडे आकर्षित झाले, जे भारताच्या पुढील 30-40 वर्षांच्या आर्थिक भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणून ओळखले.

परदेशात लाखोंच्या पॅकेजची ऑफर नाकारली

परदेशात लाखोंच्या पॅकेजची ऑफर नाकारली

आयआयटी मुंबईतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर एका युरोपियन कंपनीकडून सुमारे 50-60 लाख वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली. अशी संधी कोणताही तरुण सहजासहजी सोडत नाही, पण नीरजचे ध्येय केवळ चांगली नोकरी करणेच नव्हते. परदेशात जाण्याऐवजी भारतातच राहून काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि काही काळ मित्रांच्या कंपनीत नोकरी केल्यावर व्यवसायात पाऊल ठेवले.

तीन महिन्यांची बचत, घराचे भाडे भरणेही कठीण

तीन महिन्यांची बचत, घराचे भाडे भरणेही कठीण

2018 मध्ये मुंबईतील छोट्या फ्लॅटमधून CoinDCX सुरू करण्याची सुरुवात झाली. आयआयटी मुंबईचे विद्यार्थी – सुमित गुप्ता आणि कॉलेजमधील मित्र नीरज खंडेलवाल – यांनी मोठे यश मिळवण्याचे स्वप्न पाहिले. दोघांकडे केवळ तीन महिन्यांची बचत होती आणि त्यांना घराचे भाडे भरणेही कठीण होते. पण, सगळ्या अडचणींवर मात करून दोघांनी अशा प्रवाशाची सुरुवात केली ज्यामुळे लवकरच देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी बनले.

CoinDCX ची सुरुवात कशी झाली?

CoinDCX ची सुरुवात कशी झाली?

2018 मध्ये नीरजने एका मित्रासोबत CoinDCX सुरू केले. दोघांनी आपल्या जिद्द व चिकाटीच्या बळावर कंपनीचा झपाट्याने विस्तार केला आणि सध्या जवळपास 800 लोक इथे काम करत असून सुमारे 25,000 कोटी रुपये कंपनीची उलाढाल असल्याचे सांगितले जाते. पण इतकं आर्थिक यश मिळवूनही नीरज समाधानी नव्हते. त्यांचे ध्येय केवळ यशापुरते मर्यादित नव्हते, तर देशाच्या तांत्रिक सामर्थ्याशीही संबंधित होते. भारताला अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानात आत्मनिर्भर आणि जागतिक शक्ती बनवण्यासाठी काम सुरू केले.

CoinDCX नंतर स्पेस टेक्नॉलॉजीजची स्थापना केली

CoinDCX नंतर स्पेस टेक्नॉलॉजीजची स्थापना केली

नीरजने आयआयटीमधील वर्गमित्र आणि शास्त्रज्ञ देवासोबत बेंगळुरूमध्ये ‘ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीज’ची स्थापना केली. देवने जवळपास 10 वर्षे इस्रोमध्ये काम केलेले होते. या टीमने रॉकेट इंजिन तंत्रज्ञानावर काम सुरू केले आणि 18 महिन्यांच्या अविरत संशोधन, रचना आणि चाचणीनंतर 800 किलो-न्यूटनचे इंजिन विकसित केले ज्याला ‘एव्हरेस्ट इंजिन’ असे नाव दिले.

नव्या स्पेस टेक्नोलॉजीचे मोदींकडून कौतुगोद्गार

नव्या स्पेस टेक्नोलॉजीचे मोदींकडून कौतुगोद्गार

एव्हरेस्ट इंजिनची कामगिरी केवळ तांत्रिक प्रगती नाही. भारतातील खाजगी कंपन्या आता अत्याधुनिक रॉकेट तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत असून FFSC तंत्रज्ञान आणि एलओएक्स-मिथेन प्रणोदकावर आधारित इंजिन भारताच्या खाजगी अंतराळ क्षमतांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या प्रकल्पाचे अलीकडेच पंतप्रधान मोदींनी देखील तोंडभरून कौतुक केले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा