Devendra Gaikwad Recalled Shooting Memories With Kajol On Tanhaji Film ; Devendra Gaikwad : आम्ही 9 ला जायचो काजोल 1 ला यायची अन् तिचं करुन निघून जायची, माझ्यासमोर तिची बॉडीडबल; मराठी अभिनेत्याने सांगितला तानाजीच्या शूटचा किस्सा
Devendra Gaikwad Recalled Shooting Memories With Kajol On Tanhaji Film ; Devendra Gaikwad : आम्ही 9 ला जायचो काजोल 1 ला यायची अन् तिचं करुन निघून जायची, माझ्यासमोर तिची बॉडीडबल; मराठी अभिनेत्याने सांगितला तानाजीच्या शूटचा किस्सा
Devendra Gaikwad On Kajol : प्रवीण तरडेंच्या सिनेमात दिसणारा अभिनेता देवेंद्र गायकवाडने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने तान्हाजी या सिनेमाच्या आठवणी सांगितल्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सध्या अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये मराठी चेहरे पाहायला मिळतात. काही चेहरे हे प्रमुख भूमिकेत असतात तर काही सहकलाकारांच्या भूमिकेत असले तरीही भाव खाऊन जातात. दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर या कलाकारांना बरेचदा तेथील तफावत जाणवते. मग ते वेगवेगळ्या मुलाखतींमधून व्यक्त होतात. काही वर्षांपूर्वी अजय देवगन आणि काजोल यांची प्रमुख भूमिका असलेला तानाजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळा असलेले तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या सिनेमातून पाहायला मिळाली. विशेषता मराठमोळा इतिहास बॉलीवूडमध्ये दाखवला गेल्याने मराठी प्रेक्षकांची सुद्धा शान वाढली होती. या सिनेमातील गाणी, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींचे भरपूर कौतुक झाले. तान्हाजी या सिनेमात अभिनेता देवेंद्र गायकवाड ने सुद्धा काम केले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनेत्री काजोल आणि अजय देवगन सोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव सांगितला.
देवेंद्र गायकवाड ने सांगितले की, तान्हाजी या सिनेमांमध्ये माझा आणि काजोल चा एक सीन आहे. शूटिंग वेळी मी नऊ वाजता सेटवर पोहोचत होतो. काजोल मॅडम एक वाजता आल्या, पण सगळं त्यांचच सुरू होतं. काजोल येत होत्या त्यांचे शॉर्ट घेतले जात होते आणि आम्ही इतर सगळे कलाकार बाजूला बसून असायचो. काजोल यांचे पुढून मागून साईडने सगळ्या पद्धतीने शॉट घेतले गेले. सिनेमांमध्ये आमचे जे काही संवाद दिसतात त्यासाठी दिवसभर काजोल यांचं सहा ते सात तास शूटिंग चाललायचं. त्यांचं झालं की त्या जायच्या. बॉलीवूड मध्ये बॉडी डबल नावाची कन्सेप्ट आहे. तिच्यासारखी दिसणारी दुसरी बाई त्यांनी माझ्यासमोर उभी केली. कॅमेरा लावल्यानंतर मी माझे संवाद म्हणालो. दिग्दर्शक म्हणाले व्हेरी गुड हो गया…. मग मी म्हणालो ओके सर नो प्रॉब्लेम…. देवेंद्र गायकवाड याने द मराठी फाउंडर या पोडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही आठवण सांगितली.
शरद केळकर, सैफ अली खान, देवदत्त नागे, किरण राठोड, नेहा शर्मा, निखत खान, निस्सार खान, पद्मावती राव, शशांक शेंडे, प्रसन्न केतरकर, शिवराज वाळवेकर, अंगद म्हसकर, भाग्यश्री नवले, जगन्नाथ निवंगुणे, कैलाश वाघमारे, आरुष नंद, संदिप जुवाटकर, राजेश अहेर यांसारख्या अनेक कलाकारांनी तान्हाजी या सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. अभिनेता सैफ अली खान निगेटिव्ह रोलमध्येही भाव खाऊन गेला.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा