Headlines

Subhash Ghai On Fight With Salman Khan In Party ; त्या पार्टीत सलमानला दारू चढलेली, त्याने मला शिवीगाळ केली, सुभाष घईंनी सांगितली आठवण, पुढे दोघांमध्ये कसा झाला समेट?


Subhash Ghai Party Incident : अभिनेता सलमान खान आणि सुभाष घई यांच्यात टोकाचे वाद झालेले. त्यासंबधी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शकाने खुलासा केला.

subhash ghai
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
2008 मध्ये युवराज या सिनेमासाठी सुभाष घई आणि सलमान खान यांनी एकत्र काम केले होते. पण मध्यंतरी त्यांच्यात एक मोठा वाद निर्माण झालेला. असे म्हटले जाते की, एकदा एका पार्टीत सलमान खानने सुभाष घई यांच्याशी गैरवर्तन केले होते. ही परिस्थिती इतकी चिघळली होती की, सलमानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना यात हस्तक्षेप करावा लागला होता. त्यांनी आपल्या मुलाला दिग्दर्शक सलीम खान यांची माफी मागण्यास सांगितले होते.

एका अलीकडील मुलाखतीत, सुभाष घई यांनी 2008 मध्ये युवराज या चित्रपटासाठी सलमानसोबत काम कसे जुळून आले, याची आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘युवराज’साठी सलमान खानच्या भावाने माझ्याशी संपर्क साधला आणि विचारले, ‘तुम्ही सलमानसोबत एखादा चित्रपट का करत नाही?’ मी विचारले, ‘सलमान’ यासाठी तयार आहे का? कारण मी यापूर्वी त्याच्यासोबत कधीच काम केलेले नाही.’ त्यावर तो म्हणाला, ‘तो तयार आहे.’ त्यानंतर मी एक कथा लिहिली. कलाकाराला अशी भूमिका देणे, जी त्याने यापूर्वी कधीच साकारली नाही, हेच माझ्यासमोर नेहमीच एक आव्हान असते.”

Maharashtra TimesSunil Pal On Samay Raina : घोर कलियुग!आधी अपशब्द वापरा मग सन्मानही मिळवा; महाराष्ट्र सरकराकडून समय रैनाचा सत्कार होताच सुनील पालचा संताप

सलमानच्या प्रतिमेने त्या पात्राला झाकोळून टाकले.

चित्रपटात नेमके काय चुकले याबद्दल बोलताना सुभाष घई यांनी सांगितले की, कदाचित सलमानच्या ‘स्टार’ प्रतिमेनेच त्याच्या पात्राला झाकोळून टाकले. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या भावना व्यक्त केल्या.

सुभाष आणि सलमान यांच्यातील वाद

त्याच मुलाखतीत सुभाष घई यांनी त्या घटनेचीही आठवण सांगितली, ज्यामुळे ते आणि सलमान मित्र बनले आणि पुढे त्यांनी एकत्र काम केले. त्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, “चित्रपटापूर्वी आमचे भांडण झाले होते. आमच्यात झटापटही झाली होती. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला खडसावले होते.”

Maharashtra TimesGoshta Ajun Sampleli Nahi : मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच अंगावर काटा आणणारा प्रयोग, 360 डिग्रीत सादरीकरण! दाटलेल्या अंधारात संशयाची सावली- गोष्ट अजून संपलेली नाही

सलमान शिवीगाळ करत होता; तेव्हा त्याच्या वडिलांनी मध्यस्थी केली.

या वादाचे कारण सांगताना दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले, “आम्ही एका पार्टीत होतो. सलमान नशेत होता. तो काहीतरी अयोग्य बोलत होता, म्हणून मी त्याला म्हणालो, ‘असं बोलू नकोस.’ त्याला माझ्याबद्दल काहीतरी तक्रार होती. त्याने विचारले, ‘तू अमुक-तमुक गोष्ट का केलीस?’ त्यावर मी उत्तर दिले की, दिग्दर्शक म्हणून तो माझा निर्णय होता. तो मला शिवीगाळ करू लागला; मी त्याला तसे करु नकोस असे सांगितले. तिथे आमचा वाद झाला.” हा वाद इतका वाढला की, सलीम खान यांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी आपला मुलगा व त्या चित्रपट निर्मात्यामधील प्रकरण मिटवले.

सुभाष घई यांनी सलमानला माफ केले.

त्या घटनेची आठवण सांगताना सुभाष घई पुढे म्हणाले, “दुसऱ्याच दिवशी सकाळी सलीम साहेबांनी मला फोन करून सांगितले की, सलमानने त्याच्या आईला सर्व काही सांगितले आहे. ते म्हणाले, ‘मी त्याला खडसावले आहे.’ त्यांनी सलमानला माझी माफी मागण्यासाठी माझ्या घरी पाठवले. आणि तो आला. त्याने अत्यंत आदराने माफी मागितली. त्याने आपल्या वडिलांबद्दल दाखवलेल्या प्रचंड आदरामुळे तो मला खूप आवडला. मी तो विषय तिथेच सोडून दिला. आम्ही वारंवार भेटायचो. नंतर, आम्ही एका चित्रपटात एकत्र कामही केले.”

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा