Headlines

Polar Bear: हीच ती संधी! अस्वलांना पाहायला तोबा गर्दी, 18 लाख खर्च; पर्यटनामागचं कारण अस्वस्थ करणारं


Polar Bear: हीच ती संधी अशा जाहिराती सुरू झाल्या. शहरात पर्यटकांची तोबा गर्दी उसळली. अर्थव्यवस्थेची भरभराट झाली. पर्यटनाला चालना मिळाली. पण या आर्थिक भरभराटीमागचं वास्तव तितकंच भीषण आहे.

polar bear
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ओटावा: कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांतातील चर्चिल शहर जगभरात ध्रुवीय अस्वलांची राजधानी म्हणून ओळखलं जातं. एकेकाळी चर्चिलची अर्थव्यवस्था रेल्वे, बंदर आणि लष्करी तळावर अवलंबून होती. पण हळूहळू या सगळ्या सुविधा बंद झाल्या. सैनिकी तळ शहराबाहेर गेला. रडार स्टेशन बंद झालं. बंदराचं महत्त्व कमी झालं. रोजगाराच्या संधी कमी झाल्या. अवघी ९०० लोकसंख्या असलेल्या या भागाचं अस्तित्व संकटात सापडलं. तेव्हा चर्चिल शहराला एक नवी ओळख मिळाली. ध्रुवीय अस्वलांमुळे शहराचं भाग्य बदललं.

हडसन उपसागराच्या किनाऱ्यांवर थंडीच्या मोसमात मोठ्या संख्येनं ध्रुवीय अस्वलं दिसतात. या भागात बर्फ तयार होताच अस्वलांची गर्दी होते. स्थानिकांनी या संधीचं रुपांतर पर्यटनात केलं. विशेषत: ट्रुंडा वाहनांच्या माध्यमातून पर्यटकांना अस्वलांच्या जवळ नेलं जाऊ लागलं. यानंतर बघता बघता चर्चिल शहर जगभरात नावारुपाला आलं. वन्यजीव प्रेमींची इथे गर्दी होऊ लागली.

Polar Bear

आज इथे ध्रुवीय अस्वलं पाहण्यासाठी येणारे पर्यटक ३००० ते ८००० डॉलर (२ लाख ते ६ लाख रुपये) मोजतात. काही आर्टिक सफारींच्या पॅकेजचे दर थेट २५,००० डॉलर (१७-१८ लाख रुपये) प्रति व्यक्ती इतके आहेत. अनेक टूर ऑपरेटर पर्यटकांना थेट अस्वलांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या भागात तयार करण्यात आलेल्या लॉजमध्ये किंवा खास वाहनांमध्ये मुक्काम करण्याचा अनुभव देतात.

या पर्यटन उद्योगानं चर्चिलची स्थानिक अर्थव्यवस्था लाखो डॉलरच्या घरात पोहोचली. मात्र त्याच सुमारास चिंताजनक स्थितीदेखील निर्माण झाली. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, हडसन उपसागरातील सागरी बर्फ सातत्यानं कमी होत आहे. ध्रुवीय अस्वलं शिकारीसाठी याच बर्फावर अवलंबून आहेत. बर्फ लवकर वितळत असल्यानं आणि उशिरा गोठत असल्यानं त्यांना पुरेसं अन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर, प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला असून त्यांची संख्या घटली आहे.

polar bear canada

मॅनिटोबा विद्यापीठाच्या संशोधकांनुसार २०१६ ते २०२१ या कालावधीत चर्चिलमधील ध्रुवीय अस्वलांची संख्या २७ टक्क्यांनी घटली. १९८० च्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. हवामानातील बदल न थांबल्यास, त्याचा वेग कमी न झाल्यास २०५० पर्यंत ध्रुवीय अस्वलांसाठी स्थिती आणखी बिकट असू शकते. मात्र पर्यटन कंपन्या याचीही जाहिरात करत आहे. पर्यटनाची शेवटची संधी असं म्हणत पर्यटन कंपन्या लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या अस्वलांच्या पर्यटनाची पॅकेज विकत आहेत.

पुढील काही वर्षांत ध्रुवीय अस्वलं नामशेष होतील. त्यामुळे ती पाहता येणार नाहीत, असा विचार करुन जगभरातील पर्यटक चर्चिल गाठत आहेत. ज्यांचं भविष्य संकटात आहे, त्यांना पाहण्यासाठी गर्दी लोटत आहे. पर्यटन आणि त्यावरील खर्च वाढत आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा