South Actor On Star Pravah Serial : दाक्षिणात्य अभिनेता रवी प्रकाश लवकरच मराठी सिनेमात झळकणार असून मराठी शिकण्यासाठी अभिनेता स्टार प्रवाहची मालिका दररोज बघत असल्याचं त्यानं सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रवी प्रकाश लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. दिग्दर्शक योगेश भोसले यांच्या आगामी ‘दशमी’ या मराठी चित्रपटात ते एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी रवी प्रकाश यांनी विशेष मेहनत घेऊन मराठी भाषा शिकली असून, त्यासाठी त्यांनी स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका नियमित पाहिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पोस्टर लाँच सोहळ्यात अभिनेत्याचा खुलासा
दिग्दशर्क योगेश भोसले यांच्या ‘दशमी’ चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला रवी प्रकाश यांनी हजेरी लावली होती. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी चित्रपटातील आपल्या अनुभवाबद्दल आणि मराठी शिकण्याच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं.
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
मराठी शिकण्यासाठी पाहिली स्टार प्रवाहची मालिका
रवी प्रकाश यांनी सांगितलं की, मराठी भाषा शिकण्यासाठी त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ज्ञानदा रामतीर्थकर आणि मृणाल दुसानिस यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका पाहण्यास सुरुवात केली.
Prajakta Mali : ‘मी अधिकृतपणे क्रूरतामुक्त झालेय’, वाढदिवशी प्राजक्ता माळीचा महत्वाचा निर्णय, पोस्ट करत दिली माहिती मराठी शिकण्याच्या या अनोख्या अनुभवाबद्दल बोलताना रवी प्रकाश म्हणाले की, ‘मराठी शिकण्यासाठी मी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका पाहिली. योगायोग म्हणजे, मी ही मालिका लॅपटॉपवर पाहत असतानाच मालिकेत ‘धनंजय मोहिते’ ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रसन्न केतकर आमच्या सेटवर आले. तसंच गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात या मालिकेतील मुख्य अभिनेता विजय आंदळकरचीही भेट झाली. त्यामुळे सध्या मी आवडीनं पाहत असलेली एकमेव मराठी कलाकृती म्हणजे ही मालिकाच आहे.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा