Headlines

ssc board exam paper theft in amravati anjangaon two accused arrested ; दहावीच्या परीक्षेत चक्क उत्तरपत्रिकांचीच चोरी; अमरावतीत परिरक्षकासह 5 जणांवर गुन्हा, दोघांना अटक


SSC Exam Paper Theft Case: अमरावती विभागातील या घटनेनं शिक्षण विभागातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

ssc board exam 2026
दहावीची परीक्षा २०२६(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अंजनगाव सुर्जी येथील एका परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता दडवून ठेवल्याची धक्कादायक घटना भरारी पथकाच्या तपासणीत समोर आली. या प्रकरणी परीरक्षक व सहपरीरक्षकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजता संबंधित परीक्षा केंद्रावर दाखल झाले. त्यावेळी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होता. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका तत्काळ मोजून सील करणे बंधनकारक असते. मात्र केंद्रावर ही प्रक्रिया वेळेत पार पडत नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. उत्तरपत्रिका सील करण्यात विलंब होत असल्याने पथकाने सखोल पाहणी सुरू केली.
Maharashtra TimesPune Accident: कात्रजमध्ये भीषण अपघात; ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी
यावेळी अनिल हाडोळे नामक कर्मचारी संशयास्पद हालचाली करताना आढळला. चौकशीदरम्यान त्याची तपासणी करण्यात आली असता, त्याच्या शर्टमध्ये दडवून ठेवलेल्या दोन उत्तरपत्रिका सापडल्या. त्यापैकी एक इंग्रजी माध्यमाची तर दुसरी उर्दू माध्यमाची असल्याचे समोर आले. संबंधित कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. घटनास्थळी परीरक्षक सुधीर खोडे आणि सहपरीरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर उपस्थित असूनही त्यांनी कोणतीही तातडीची कारवाई केली नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. सर्व उत्तरपत्रिका नियमानुसार कस्टडीत जमा करणे बंधनकारक असताना, संगनमताने दोन उत्तरपत्रिका बाहेर काढून एका खासगी व्यक्तीकडे ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे आणि ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या घोटाळ्यामागील नेमका हेतू काय, याचा शोध घेतला जात आहे.

Maharashtra TimesMumbai Crime: आठवीतील विद्यार्थ्याची तलावात बॉडी; पोहताना बुडाल्याचा संशय, पण सत्य काही वेगळंच, तीन मित्र अटकेत
फरार आरोपीचा शोध सुरू
उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांच्या तक्रारीवरून परीरक्षक सुधीर खोडे, सहपरीरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर, अनिल हाडोळे व दोन अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोडे आणि हाडोळे यांना पोलिसांनी अटक केली असून अभ्यंकर फरार असल्याची माहिती आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. यापूर्वी वाशीम जिल्ह्यात सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा