Tech Stocks Crash: 2026 मध्ये फिनिक्स भरारी घेतलेल्या शेअर बाजाराला नेमकं झालंय काय? अवघ्या काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाचा शेअर बाजाराची (KOSPI) स्वप्नवत धाव सुरू होती, आणि गुंतवणूकदारांना भरभरून परतावा मिळत होता पण आता पूर्णपणे चित्र बदललं आहे. होय, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सध्या मंदीच्या गर्तेत सापडला आहे.
जेव्हा एखादा शेअर बाजार उच्चांकी शिखरावरून 20% किंवा त्याहून अधिक घसरतो,तेव्हा त्याला ‘बेअर मार्केट’ किंवा मंदी असं म्हटलं जातं. म्हणजे अगदी काही काळापूर्वी सतत उंचच उंच झेप घेणारा कोस्पी आता उच्चांकावरून 20 टक्क्यांनी घरंगळला असून यामुळे कंपन्यांचे अंदाजे 40.47 लाख कोटी रुपयांनी नुकसान झाल्याचे समजले आहे.
गेल्या काही दिवसांप्रमाणे कोरियन शेअर बाजारात बुधवारी, सलग तिसऱ्या दिवशी, विक्रीची लाट उसळली. कोस्पी जवळपास 310 अंकांनी, म्हणजेच 4% घसरून 7347 वर खाली आला तर, या तीव्र घसरणीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
कोरियन शेअर बाजारातील हेवीवेट स्टॉक्सपैकी दिग्गज सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरच्या किमतीत बुधवारी जवळपास 4% घसरण झाली असून या दरम्यान गुंतवणूकदारांनी तब्बल 300 दशलक्ष डॉलर्सहून अधिक किमतीच्या शेअर्स विकले. पण अलीकडच्या तीव्र विक्रीच्या लाटेनंतरही कोस्पीने जगातील सर्वोत्तम कामगिरी करणारा प्रमुख शेअर निर्देशांक म्हणून मान कायम ठेवला आहे. त्याचवेळी, गोल्डमन सॅक्स कोरियाई शेअर बाजाराबद्दल आशावादी दिसत आहे.
दक्षिण कोरियाची आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या घसरणीला कारणीभूत ठरली. बुधवारी सॅमसंग शेअर्समध्ये जवळपास 4% घसरण झाली, तर आदल्या दिवशी मंगळवारी सॅमसंग शेअर्स तब्बल 10% घसरलेले. विशेष म्हणजे कंपनीने दुसऱ्या तिमाहीसाठी परिचालन नफ्यात 19 पटीने वाढण्याचा अंदाज वर्तवला तरीही, गुंतवणूकदारांनी या स्टॉक फिरवली.
बाजार तज्ज्ञ म्हणतात की, सॅमसंगकडून गुंतवणूकदारांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या आणि मागील काही महिन्यांत मेमरी चिप्सच्या किमतीत मोठी वाढ झाली, ज्यामुळे बाजारात सकारात्मक निकालांची अपेक्षा होती. पण अलीकडच्या निकालात गुंतवणूकरांना वेगळं काहीच आढळलं नाही, ज्यामुळे अनेक लोक नफा काढून घेऊ लागले.
मात्र, केवळ कोरियन बाजारचं नव्हे तर अमेरिकी शेअर मार्केटमधील टेक स्टॉक्समध्ये विक्रीचा जोर वाढला. टेक कंपन्यांचा नॅसडॅक निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला आणि अनेक प्रमुख चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली.
इंटेलचे शेअर्स 10% घसरले, तर मायक्रोसॉफ्टही विक्रीला अपवाद ठरला नाही. AMD चे शेअर्सही दबावाखाली राहिले असून फिलाडेल्फिया सेमीकंडक्टर निर्देशांक सुमारे 5% घसरला. यामुळे सध्या जगभरात चिप क्षेत्र दबावाखाली असल्याचे अलीकडच्या घसरणीतून स्पष्ट होते.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा