Satara tragic end of four family members due to electric shock incident in phaltan taluka; सातारा जिल्ह्यातील खामगाव इथं विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Satara tragic end of four family members due to electric shock incident in phaltan taluka; सातारा जिल्ह्यातील खामगाव इथं विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Phaltan News: एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील चौघांचाही जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
सातारा जिल्ह्यातील खामगाव इथं विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : फलटण तालुक्यातील खामगावमध्ये दुर्दैवी घटना घडली असून एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला आहे. घराच्या अंगणात कुटुंबातील व्यक्तीला शॉक लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यही धावले. मात्र या प्रयत्नात एकमेकांना पकडल्याने विजेचा शॉक लागून आई, वडील, मुलगा आणि मुलगी, असे चौघेही मृत्युमुखी पडले. सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय 45), गंगुबाई सतीश शिंदे (वय 40), सचिन सतीश शिंदे (वय 26) आणि आरती सतीश शिंदे (वय 24, रा. खामगाव, ता. फलटण), अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी पहाटे ६ वाजण्याचा सुमारास सतीश उर्फ पिसुरड्या शिंदे हे घराबाहेर थांबले होते. यावेळी ते विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानंतर सतीश यांना विजेचा शॉक लागला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी आणि मुलांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, सतीश शिंदे यांच्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलांनाही विजेचा जबर धक्का बसला.
विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेलं शिंदे कुटुंब हे फलटण तालुक्यातील खामगावातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ वास्तव्यास होतं. बुधवारी सकाळी उठून घराबाहेर आलेल्या सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे यांना विजेचा जोरदार झटका बसला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील चौघांचाही जागीच अंत झाला.
दरम्यान, या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ हे पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. घराबाहेरील विद्युत वायरमध्ये नेमका वीज प्रवाह कसा आला, यामागे महावितरणचा तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण आहे, याबाबतचा सखोल तपास केला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा