Headlines

Sohail Khan Wanted To Took Son Name Ram Khan :Sohail Khan : मला मुलाचे नाव राम खान ठेवायचे होते, सोहल खानने सांगितला बदलेल्या नावाचा किस्सा, घटस्फोटानंतर मुलं राहतात कुठे?


Sohail Khan Son Name : अभिनेता सोहेल खानने नुकत्याच एका कार्यक्रमात त्याला त्याच्या मुलाचे नाव राम खान ठेवण्याची इच्छा होती असे सांगितले.

sohail khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बॉलिवूड अभिनेता सोहेल खान सध्या कुणाल खेमूद्वारे होस्ट केल्या जाणाऱ्या ‘अलायन्स’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह देखील या शोचा भाग आहे. अलीकडील एका भागात, सोहेलने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक किस्सा सांगितला; त्याने उघड केले की, त्याला आणि सीमाला त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव ‘राम खान’ ठेवायचे होते.

“जर मुलगा झाला, तर मी त्याचे नाव…”

शोदरम्यान, सह-स्पर्धक अली गोनीने सोहेल आणि सीमाच्या मुलांचे कौतुक केले. त्याने सांगितले की दोन्ही मुले अतिशय सुसंस्कृत आहेत आणि निर्वाण हुबेहूब त्याचे वडील सोहेलसारखा दिसतो. त्यानंतरच सोहेलने मुलाच्या नामा मागचा किस्सा सांगितला. सोहेल खान म्हणाला, “जेव्हा सीमा गरोदर होती, तेव्हा आम्ही गंमतीने ठरवले होते की जर मुलगा झाला तर त्याचे नाव मी ठेवेन आणि जर मुलगी झाली तर सीमा नाव निवडेल. माझ्या मुलाचे नाव ‘राम खान’ ठेवावे, अशी माझी मनापासून इच्छा होती. आम्ही सर्वधर्मसमभावावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत, म्हणूनच मी तसा विचार केला होता.”

Maharashtra TimesShekhar Suman : जीवंत प्रेतांच्या गर्दीत तोच एक खरा जीवंत माणूस, शेखर सुमन यांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह

निर्णय कसा बदलला आणि मुलाचे नाव ‘निर्वाण’ कसे ठेवले गेले

सोहेलने पुढे सांगितले की, प्रसूतीनंतर सीमाला जेव्हा शुद्ध आली, तेव्हा तिच्या मनात मुलाचे नाव आधीच निश्चित होते. सोहेल म्हणाला, “डॉक्टरांनी मुलगा झाल्याचे सांगताच मी खोलीत गेलो. सीमाला तेव्हा अजूनही गुंगी होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि विचारले, ‘निर्वाण कसा आहे?’ तिने हे इतक्या आपुलकीने विचारले की त्यानंतर मला ते नाव बदलावेसे वाटले नाही. निर्वाण स्वभावाने अत्यंत शांत आहे.”

Maharashtra TimesTharala Tar Mag : तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी सचिनच्या मदतीने प्रियाचा सापळा, परफ्यूमच्या सुगंधामुळे चैतन्यचा श्वेतावर संशय

24 वर्षांनंतर घटस्फोट, तरीही परस्पर आदर कायम

सोहेल खान आणि सीमा सचदेह यांनी 1998 मध्ये घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन पळून लग्न केले होते. सीमा हिंदू होती तर सोहेल मुस्लिम असल्यामुळे तिच्या घरी या लग्नाला विरोध होता. त्यांना या लग्नानंतर काही वर्षांनी निर्वाण आणि योहान अशी दोन मुले आहेत. 24 वर्षांहून अधिक काळ एकत्र राहिल्यानंतर, या जोडप्याने 2022 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही ते आपल्या मुलांची जबाबदारी संयुक्तपणे पार पाडत आहेत.

दोन्ही मुले सोहेल खानसोबत राहतात

‘अलायन्स’ या शोमध्ये सोहेलने सांगितले की, जरी त्याच्या आणि सीमामधील प्रेमसंबंध, संसार संपला असले, तरीही तो आपल्या एक्स पत्नीचा खूप आदर करतो. त्याने नमूद केले की दोन्ही मुले त्याच्यासोबत राहतात आणि सीमा मुलांना भेटण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस त्याच्या घरी येते.