Headlines

साटेली माऊली हरीनाम सप्ताह 25 जुलै रोजी


सातार्डा : साटेली येथील स्वयंभू देवी माऊली देवस्थानचा अखंड हरीनाम सप्ताह प्रतीवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी शनिवार दि. 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. स्थानिकांची भजने होणार आहेत. सुहासिनिंनी ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत.दहिकाला होणार आहे. त्यानंतर सातार्डा गावातील भाविकांकडून दिंडीयात्रा काढण्यात येणार आहे.त्यानंतर भाविकांना कौल देण्यात येणार आहे.हरीनाम सप्ताहाला भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी माऊली जीर्णोद्धार देवस्थान कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत