Headlines

Simi Garewal : 100 पुरस्कार विजेती अभिनेत्री, 5 वेळा प्रेमभंग; लग्नाच्या 9 वर्षात घटस्फोट, वयाच्या 78व्या वर्षी जगतेय सिंगल आयुष्य


Simi Garewal : सुप्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवालचं नाव काही अभिनेते, जामनगरचा राजा यांच्यासोबत जोडलं गेलेलं. अभिनेत्रीचं लग्न झालेलं, पण तिचा घटस्फोट झाला.

Simi Garewal Unknown Facts
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत, काही कलाकारांचं वैयक्तिक आयुष्यही तितकेच चढ-उतारांनी भरलेलं होतं. सिमी गरेवाल ही अशीच एक अभिनेत्री आहे. चित्रपटांमध्ये स्वतःला सिद्ध केल्यानंतर, तिनं आपल्या कार्यक्रमाद्वारे टेलिव्हिजनवर एक विशेष स्थान मिळवलं. सिमीला जवळपास १०० पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जामनगरचे महाराजा, पतौडीचे नवाब आणि रतन टाटा यांच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं. अभिनेत्रीचं लग्नही झालेलं. मात्र, लग्नाच्या नऊ वर्षात सिमीचा घटस्फोट झाला.

Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा

सिमीनं ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असलं आणि तिला १०० हून अधिक पुरस्कार जिंकले असले तरी तिचे ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘सिद्धार्थ’ हे दोनच सिनेमे गाजले. सिमीनं बॉलिवूडला रामराम केला आणि स्वतःच्या कार्यक्रमाद्वारे ओळख मिळवली. इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल, वयाच्या पाचव्या वर्षी एका चित्रपटात राज कपूर यांना पाहून त्यांची चाहती झाली. अभिनेत्रीनं इंडस्ट्रीत पदार्पण करताच कधी राज कपूर तर कधी मनमोहन देसाई यांच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं.

Maharashtra TimesAjit Vachani : अभिनेत्यानं बॉलिवूड गाजवलं, शाहीर साबळेंच्या लेकीसोबत लग्न; वयाच्या 52व्या वर्षी निधन, मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री
१९८१ मध्ये, सिमी प्रसिद्ध दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या ‘नसीब’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसलेली. त्यानंतर सिमी आणि मनमोहन देसाई यांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या. त्यानंतर ते अनेक प्रसंगी एकत्र दिसले. यापूर्वी सिमीचं नाव जामनगरच्या महाराजांसोबतही जोडलं गेलं. २०१३ मध्ये फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सिमीनं सांगितलेलं की, वयाच्या १७ व्या वर्षी ती जामनगरच्या महाराजांच्या प्रेमात पडली आणि त्यांचं तीन वर्ष रिलेशनशिप होतं. इतकंच नव्हे तर, सिमीचं नाव मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी जोडलं गेलं. त्यावेळी त्यांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. सिमीनं नंतर खुलासा केला की, पतौडी खूप चांगल्या स्वभावाचे होते आणि तिच्या शूटिंगलाही यायचे. पण, हे नातं फार काळ टिकलं नाही. नंतर, अभिनेत्री शर्मिला टागोर पतौडींच्या आयुष्यात आल्या आणि १९६८ मध्ये त्यांनी लग्न केलं.

Maharashtra TimesViraj Jagtap : ‘बॅग घेऊन जायचं, परत यायचं नाही’, विराज जगतापवर भडकलेले सचिन गोस्वामी, अभिनेत्यानं सांगितला किस्सा
सिमी गरेवालचं नाव उद्योगपती रतन टाटा यांच्याशीही जोडले गेलं होतं. या नात्याचीही बरीच चर्चा झाली. सिमीनं स्वतः २०११ मध्ये त्यांच्या नात्याची कबुली दिलेली. अभिनेत्रीनं सांगितलं की, ती आणि रतन टाटा एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत होते आणि ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यांचं नातं लग्नापर्यंत कधीच पोहोचलं नाही.

Simi Garewal

सिमी गरेवालचं लग्न अन् घटस्फोट

सिमीने १९७० मध्ये रवी मोहन यांच्याशी लग्न केलं. रवी मोहन हे दिल्लीतील जुन्या आणि प्रतिष्ठित चुनामल घराण्यातील होते. पण, लग्नाच्या तीन वर्षांनंतर ते वेगळे राहू लागले आणि १९७९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सिमीनं एका मुलाखतीत सांगितलं की, रवी मोहन एक चांगला माणूस होता आणि ते एकमेकांशी एकनिष्ठ होते, पण देवानं त्यांना एकमेकांसाठी बनवलं नव्हतं. सिमीचं नाव पाकिस्तानी व्यावसायिक सलमान तासीर यांच्याशी जोडलं गेलं होलं. घटस्फोटानंतर सिमीनं पुन्हा लग्न केलं नाही. अभिनेत्रीनं सांगितलं की, एक स्वतंत्र स्त्री लग्नाशिवायही आनंदी राहू शकते.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा