Headlines

Shivsena ubt leader vasant more receives offer from eknath shinde shiv sena; “तात्या…शिंदेसाहेब तुमची वारंवार आठवण काढत आहेत”; वसंत मोरेंना देखील शिंदेंच्या शिवसेनेची खुली ऑफर


पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार व पुण्याचे माजी संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. अहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापतीपद देऊन बक्षीस देण्यात आले आहे. या राजकीय घडामोडींनंतर, आता पुण्याचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनाही शिंदेंकडून खुली ऑफर आल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ३० एप्रिल रोजी वसंत मोरे यांच्याकडे पुणे शहरप्रमुख (महानगर प्रमुख) पदाची मोठी जबाबदारी सोपवली. मात्र, या नियुक्तीच्या बरोबर एक दिवस आधी, म्हणजेच २९ एप्रिलच्या रात्री मोरे यांना एकनाथ शिंदे गटातील एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फोनवरून मोरेंना स्पष्ट शब्दांत ऑफर देण्यात आली होती. “शिंदेसाहेब तुमची वारंवार आठवण काढत आहेत. तुम्ही आमच्या पक्षात आल्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल. याबाबत साहेबांशी सविस्तर चर्चा झाली असून, पक्षात आल्यास तुम्हाला मोठी जबाबदारी आणि महापालिकेत एक प्रशस्त कार्यालय देखील दिले जाईल,” असे या नेत्याने मोरेंना सांगितले.

या अनपेक्षित ऑफरवर वसंत मोरे हे फोन करणाऱ्या त्या नेत्याला म्हणाले की, “तुमच्या पक्षात आधीच अनेक दिग्गज नेते असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तिथे काय गरज?” यावर त्या नेत्याने स्पष्ट केले की, “तुमचा तळागाळातील जनसंपर्क दांडगा असून, तुमच्याकडे सोशल मीडियाची मोठी ताकद आहे. तुम्ही एक प्रभावी नेते आहात. त्यामुळे पक्षाच्या विस्तारासाठी आणि वाढीसाठी तुमच्या या प्रभावाचा आम्हाला निश्चितच मोठा फायदा होईल, अशी पक्षनेतृत्वाची धारणा आहे.”

शिंदेंच्या शिवसेनेकडून आलेल्या या ऑफरची माहिती वसंत मोरे यांनी लपवून न ठेवता, त्याच रात्री पक्षाचे तत्कालीन संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या कानावर घातली होती. या राजकीय घडामोडींचे गांभीर्य आणि संभाव्य धोका ओळखून ठाकरे गटाने तातडीने सूत्रे हलवली. दुसऱ्याच दिवशी, ३० एप्रिल रोजी वसंत मोरे यांच्यावर पुणे महानगरप्रमुख पदाची धुरा सोपवून त्यांना पक्षात मानाचे स्थान दिले. त्यावेळी वसंत मोरे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत शिंदे गटाची ती ऑफर नाकारली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. ज्या सचिन अहिर यांना त्यांनी या ऑफरची माहिती विश्वासाने दिली होती, तेच अहिर आता शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवाय, ‘ऑपरेशन टायगर’ यापुढेही अधिक आक्रमकपणे सुरूच राहील, असे स्पष्ट संकेत खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान, वेगाने बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आगामी काळात काय राजकीय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत