Mumbai Man Aslam Shaikh falls in open Manhole at Andheri Sakinaka Khairani Road Crime News; अंधेरीत २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पादचारी पडला, पहिल्याच पावसात मुंबईत दुर्घटना, बचावाचे प्रयत्न
Mumbai Man Aslam Shaikh falls in open Manhole at Andheri Sakinaka Khairani Road Crime News; अंधेरीत २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पादचारी पडला, पहिल्याच पावसात मुंबईत दुर्घटना, बचावाचे प्रयत्न
Mumbai Andheri Man falls in Manhole : २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून अंधेरीत एका पादचाऱ्याला प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : स्कूल बसवर झाड पडून चेंबूरमध्ये ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत पावसामुळे आणखी एक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याला प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे. अंधेरीतील साकीनाका परिसरात खैरानी रोडवर गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हा अंगावर शहारे आणणारा प्रकार घडला आहे. अस्लम शेख असे ५५ वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी यासंदर्भात माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य करत होते
नेमके काय घडले?
मुंबईत गेल्या दोन दिवासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यात सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक सखल भागात पाणीही साचले आहे. पावसात पाणी साचल्याने कार्यालयात जाणे अशक्य झाल्यामुळे अस्लम शेख घरी माघारी फिरण्याच्या तयारीत होते. यावेळी अंधेरीतील साकीनाका परिसरात खैरानी रोडवर असलेल्या सन्मान हॉटेलच्या समोर असलेल्या मॅनहोलजवळ आले असताना, पावसाच्या पाण्यामुळे त्यांना मॅनहोल असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे ते एका उघड्या जागेत पडले. त्यानंतर ते वाहत जाऊन १० ते १५ फूट अंतरावरील दुसऱ्या मॅनहोलजवळ दिसले. Pune Crime : ना प्रत्यक्षदर्शी, ना पुरावा; केतनला नक्की दरीत कोणी ढकललं? पुणे पोलिसांची कोर्टात धाव, केसला नवी दिशा देणारी मागणी
सुटकेचे प्रयत्न
काही कामानिमित्त मॅनहोलवरील झाकण उघडले असताना अस्लम शेख त्यात पडल्याची माहिती आहे. मात्र या ठिकाणी बॅरिकेट केले नसल्याचा आरोप केला जात आहे. जवळपास तीन तासाहून अधिक काळ त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाचे जवान शिडीच्या सहाय्याने त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले.
सचिन अहिर यांना एकनाथ शिंदेंकडून गिफ्ट; उपसभापती पदाबाबत नीलम गोऱ्हे थेट बोलल्या
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया देताना संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे सांगितले. “फोनवर बोलत असताना अस्लम शेख मॅनहोलमध्ये पडले. त्यांची छत्री आणि चप्पल आढळली आहे. मी वॉर्ड ऑफिसर हेर्लेकर यांच्याशी बोलले, मात्र वॉर्ड ऑफिसरने कुठलीही वर्क ऑर्डर दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. आदेश नसताना हे काम कसे सुरु होते” असा सवाल असल्याचं नमूद करत चौकशी करण्याच सांगितल्याचे रितू तावडे म्हणाल्या.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा