Headlines

Shiv Sena Thane MP Naresh Mhaske claims Sanjay Raut abused Uddhav Thackeray Rashmi Thackeray; पवईतील हॉटेलमध्ये संजय राऊत यांची उद्धव-रश्मी ठाकरेंबाबत अर्वाच्च भाषा, खासदार नरेश म्हस्केंचा दावा; मुख्यमंत्रिपदासाठी स्वतःचं नाव पुढे केलेलं


Naresh Mhaske on Sanjay Raut : “राज्यसभेची उमेदवारी संजय राऊत यांना जाहीर करताना विलंब झाला होता, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना शिव्या घातल्या होत्या.” असा दावाही खासदार नरेश म्हस्के यांनी केला

Uddhav Thackeray Rashmi Thackeray Sanjay Raut Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे/नवी दिल्ली : ” उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू नयेत, यासाठी पवईतील हॉटेलमध्ये खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना बैठक घ्यायला लावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंना विरोध करा, माझं नाव पुढे करा, असा आग्रह संजय राऊत यांनी आमदारांपुढे धरला होता. राऊत यांनी याच बैठकीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांना शिव्यांची लाखोली वाहिली” असा दावा ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तक्रारींचे एक तरी पत्र दाखवा, नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हान खासदार म्हस्के यांनी राऊत यांना दिले. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘उद्धव-रश्मी ठाकरेंना शिव्या’

खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “राज्यसभेची उमेदवारी संजय राऊत यांना जाहीर करताना विलंब झाला होता, त्यावेळी राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या. उद्धव ठाकरेंविरोधात राऊत यांनी पवईतील हॉटेलात आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात गरळ ओकली” असा धक्कादायक आरोप खासदार म्हस्के यांनी केला.

Maharashtra TimesTalasari Crime : मित्रासोबत घरी जाताना बाईक बिघडली, वाटेत सहा जणांनी बंगल्यात ओढून नेलं, 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पालघर हादरलं

‘भावाला मंत्रिपद दिलं नाही’

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण स्वत:च्या भावाला मंत्रिपद दिले नाही. तसेच खासदारकीची उमेदवारी देण्यात उशीर झाल्याने संजय राऊत हे उद्धव ठाकरेंवर चिडले होते, हे शिवसेनेला माहित आहे” असे म्हस्के म्हणाले. “एकनाथ शिंदेंसोबत जाणारा पहिला जिल्हा प्रमुख मी आहे. उद्धव ठाकरेंनी फोन केला तेव्हा त्यांनाही मी वर्षा बंगल्यावर येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यावरील अन्याय दूर करा, पक्षाला त्यांची गरज आहे, असे उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगणारा मी एकमेव होतो” असे खासदार म्हस्के म्हणाले. “ठाण्याचे नेतृत्व कर, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, मात्र आपण शिंदे साहेबांसोबतच जाणार, असे वर्षा बंगल्यावर ठणकावून सांगणारा मीच एकमेव होतो” असे खासदार म्हस्के म्हणाले.

Maharashtra TimesKiran Indulkar : 50 ग्रॅम पावडरच्या धमकीनंतर पोलीस दलाला पुन्हा काळिमा; सापळा रचला अन् पोलीसच रंगेहाथ सापडला, कॉन्स्टेबल इंदुलकरला अटक

संजय राऊतांनी परिषदेचा शब्द दिलेला

सकाळचा भोंगा अशी उपमा दिल्याने संजय राऊतांना आपल्यावर राग आहे, असे म्हस्के म्हणाले. विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, असे राऊत तुम्ही अयोध्येत मला एकनाथ शिंदेंसमक्ष सांगितले होते. पण आमशा पाडवी यांना तिकिट दिले कारण नरेश म्हस्के एकनाथ शिंदेंसोबत जाईल म्हणून संधी देऊ नका, असे उद्धव ठाकरेंना कोणी सांगितले, असा सवाल खासदार म्हस्के यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ फोन करुन तुम्ही काय काय बोलत होतात, हे तुम्हीच जाहीर करा. एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारीचे एकतरी पत्र दाखवा अन्यथा तुमच्या खासदाराकीचा राजीनामा द्या, असे प्रतिआव्हान खासदार म्हस्के यांनी दिले.

‘राऊतांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता’

राऊत यांचे ठाकरेंबाबत बेगडी प्रेम आहे. उद्धव ठाकरेंच्या डोक्यात मुख्यमंत्री होण्याचे खूळ राऊत यांनीच घातले आणि महाराष्ट्राला एक कुचकामी मुख्यमंत्री दिला. एकसंध पक्षाचे वाटोळे करण्याचे काम राऊत यांनी केले. राऊतांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता आणि काँग्रेसमध्ये विलीन करायचा आहे, अशी घणाघाती टीका खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली. शिवसैनिकांचे शाप तुम्हाला भोगावे लागतील, असे खासदार म्हस्के म्हणाले.