Headlines

Shalarth ID Scam: संस्थाचालक ‘नॉट रिचेबल’; शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी तपासाची चक्रे वेगात


Shalarth ID Scam: जळगाव तालुका, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव व पारोळा तालुक्यांतील काही संस्थांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

shalarth id case
शालार्ड आयडी घोटाळा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक येथील तपास पथकाने जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर आणि शेंदुर्णी येथील संस्थाचालक संजय गरूड यांना केल्यानंतर खान्देशातील आणखी डजनभर संस्थाचालक आता संशयाच्या फेऱ्यात असल्याचे वृत्त असून, स्वत:ला शिक्षण क्षेत्रातील मातब्बर म्हणून मिरवणारे अनेक संस्थाचालक जिल्ह्यातून अचानक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. काहीजण दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याची चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्यातील दहा, तसेच धुळे जिल्ह्यातील दोन शिक्षण संस्थाचालक पोलिसांच्या रडारवर असल्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील १० मोठे मातब्बर संस्थाचालक व चार अधिकाऱ्यांचा पाय खोलात आहे. यातील पाच ते सहा संस्थाचालक मोबाइल बंद करून अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

Maharashtra TimesGadchiroli Rain: गडचिरोलीला पुराचा वेढा! सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस, 15 गावांचा संपर्क तुटला
शिवसेना उबाठा आक्रमक
भाजप ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी कंपनी बनली आहे. शालार्थ आयडी प्रकरणात कारवाई झालेला संजय गरूड हा केवळ छोटा मासा असून, या घोटाळ्याचा खरा ‘मास्टरमाइंड’ वेगळाच आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जळगाव उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी केला आहे. शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

मुख्याध्यापकांची चौकशी
नाशिक : सरकारची १६० कोटी रुपयांची फसवणूक करून झालेल्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात भाजप पदाधिकारी तथा शिक्षणसंस्था चालक संशयित संजय भास्कर गरूड याला हृदयविकारामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी वैद्यकीय अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने रुग्णालयातून चौकशीची सूचना केली आहे. त्यातच गरूडच्या शिक्षण संस्थेच्या १५ शाळांतील मुख्याध्यापकही रडारवर आले असून, त्यांची बुधवारी नाशिकमध्ये कसून चौकशी करण्यात आली.
Maharashtra TimesIndian Railway: कन्फर्म तिकिटांसाठी बनावट VIP मार्ग; लोकभवनाच्या खोट्या शिक्क्यांचा वापर, सूत्रधारासह 3 रेल्वे एजंट अटकेत
नाशिकरोड पोलिसांत मार्च २०२६ मध्ये दाखल गुन्ह्यात नाशिक विभागातील ८४१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ‘शालार्थ आयडी’ बनावट असून, त्यापैकी ६३८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जळगाव जिल्ह्यातील आहेत. या गुन्ह्यात सहावा संशयित संजय गरूड याला न्यायालयाने त्याला एक ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. यानंतर त्याच्या छातीत दुखत असल्याच्या कारणावरून मंगळवारी (२८ जुलै) रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, धुळ्यातील शिक्षण संस्थाचालक प्रशांत वाडिले याला अटक झाल्यापासून गरूड सोलापुरात लपला होता. त्याने १७७ शिक्षक व कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी दिले आहेत, त्यापैकी १४१ जणांचे आदेश २८ ऑगस्ट २०१९ या एकाच दिवशी निर्गमित झाले आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा