Abhijeet dipke allegations against narendra modi and amit shah threats for joining bjp over student protest; मला विदेशी फंडिंग असेल तर हे गृहमंत्री अमित शाह यांचं अपयश, भाजप प्रवेशाचीही ऑफर; अभिजीत दीपकेचे सरकारवर गंभीर आरोप
Abhijeet dipke allegations against narendra modi and amit shah threats for joining bjp over student protest; मला विदेशी फंडिंग असेल तर हे गृहमंत्री अमित शाह यांचं अपयश, भाजप प्रवेशाचीही ऑफर; अभिजीत दीपकेचे सरकारवर गंभीर आरोप
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: जेन-झी विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या अभिजीत दिपके याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. “मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचा आहे. अवघ्या ३० वर्षांच्या तरुणाला भाजपमध्ये येण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. भाजपमध्ये ये नाहीतर तुझ्या घरी जाऊन आई-वडिलांना पाहून घेऊ, तुला गोळ्या घालू’, अशा धमक्या दिल्या जात होत्या,” असा खळबळजनक आरोप दिपके याने केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीचे समर्थन करत दिपके म्हणाला की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला पाहिजे. आमच्या आंदोलनाला बाहेरून फंडिंग होते आणि आपली पार्टी बाहेरून चालवली जाते, असा आरोप ते करतात. जर हे खरे असेल तर गृहमंत्री म्हणून हे अमित शाह यांचे थेट अपयश आहे,” असा थेट आरोप त्याने केला.
“खाकी पॅन्ट काढून खाकी चड्डी घाला आणि..”
नाशिक पोलिसांच्या व्हिडिऑग्राफीवरील एसओपी आणि जंतर-मंतरवरील पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना अभिजीत दिपके याने आक्रमक टीका केली. तो म्हणाला, “देशातील पोलीस ही कोण्या एका पक्षाचे किंवा भाजपच्या फॉरवर्ड मेसेजवर चालणारे पोलीस नाही. पोलिसांना कॅमेऱ्याची भीती वाटत असेल तर त्यांनी संविधान फॉलो करावे. जर तुम्हाला फक्त भाजपचेच आदेश पाळायचे असतील, तर खाकी पॅन्ट काढून खाकी चड्डी घाला; भाजप मुख्यालयासमोर उभे राहा आणि ‘मै भी चौकीदार’ म्हणा,” असा खरमरीत टोला त्याने लगावला.
“मोदी, धर्मेंद्र अन् देवेंद्र… कुणालाच शिक्षणाचं पडलेलं नाही”
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवर आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर भाष्य करताना अभिजीत दिपके यानं म्हटलं आहे की, “नरेंद्र असो, धर्मेंद्र असो की देवेंद्र असो, या लोकांना शिक्षणाचं काहीच पडलेलं नाही. देवेंद्र फडणवीस बहुदा आतापासूनच २०२९ च्या निवडणुकीच्या तयारीला लागले असतील, त्यामुळे त्यांना एमपीएससी आणि टीईटीच्या पेपरफुटीशी काहीही देणंघेणं नाही. भाजपच्या मंत्र्यांची मुले परदेशात शिकतात, ती थोडीच टीईटी किंवा पोलीस भरतीची परीक्षा देणार आहेत? महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही राज्यातही मोठे आंदोलन उभारणार आहोत,” असा इशारा त्याने दिला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा