Headlines

Sensex, Nifty50 Stock Market Crash; ट्रम्प यांच्या विधानाने बदलला बाजाराचा टोन; पत्त्यासारखा कोसळला शेअर बाजार, सेन्सेक्समध्ये 1600 अंकांची आपटी


जागतिक शेअर मार्केट केवळ कंपन्यांच्या कामगिरीवर चालत नाही तर, एखाद्या प्रमुख नेत्याचे एकच विधान बाजाराची दिशा बदलू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अशाच एका विधानाने भारतासह जागतिक शेअर मार्केटला नवीन दिशा दिली आहे. बुधवारी सकाळी इराणच्या ठिकाणांवर सैन्य कारवाई केल्यावर ट्रम्प यांनी इराणबाबत अनेक महत्त्वपूर्ण वक्तव्ये केली.

यानंतर भारतासह जागतिक शेअर बाजारांमध्ये पुन्हा एकदा घसरणीचे वर्चस्व पाहायला मिळाले. अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढला, तर त्याचा परिणाम केवळ पश्चिम आशियापुरता मर्यादित न राहता जगभरातील बाजारांवर होऊ शकतो, अशी गुंतवणूकदारांना भीती आहे.

Maharashtra TimesPakistan Crisis: पाकिस्तानात मृत्यूही महाग! कबर, कफन, फुला-फळांसाठी सामान्यांचा संघर्ष; महागाईच्या भस्मासुरचे पाकिस्तान थैमान!

इराणसोबत MoU ‘संपला’: ट्रम्प यांचे विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत कठोर भूमिका घेतली आणि म्हटले आहे की, अमेरिकेने इराणसोबत वाटाघाटींमध्ये बराच वेळ घालवला आणि आता तेहरानला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू देणार नाही. जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव पूर्णपणे निवळलेला नाही आणि अणुकार्यक्रमावरून मतभेद कायम असताना ट्रम्प यांच्या नव्या विधानाने जागतिक बाजारात खळबदल उडवून दिली असून या विधानानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये आणखी मोठी घसरण झाली, ज्यामुळे अनिश्चितता वाढली.

“मला वाटतं, आता हे (MoU) संपला आहे. मला त्यांच्याशी काहीही देणंघेणं ठेवायचं नाही… ते लोक विकृत आहेत… अत्यंत क्रूर आणि हिंसक प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्याशी व्यवहार करण्यात वेळ वाया घालवणे व्यर्थ आहे, ते लबाड आहेत.”

Maharashtra TimesUS Strike Iran: होर्मुझमध्ये पुन्हा तणाव वाढला… अमेरिकेकडून इराणी तेलावरील सवलत रद्द, Crude Oil च्या किमतीत मोठी उसळी

ट्रम्प यांच्या विधानाने भारताचा शेअर बाजार कोसळला

ट्रम्प यांनी इराणबाबत वरील विधान करताच दुपारी 2 च्या सुमारास मुंबई शेअर बाजार 1506.86 अंक किंवा 1.93% घसरून 76,673.86 वर आला, तर राष्ट्रीय शेअर मार्केटचा निफ्टी50 निर्देशांक 461.05 अंकांनी घसरून 23,937.65 वर घरंगळला.

दुसरीकडे क्षेत्रीय आघाडीवर मेटल, फार्मा आणि रिअल्टी क्षेत्र वगळता निफ्टीच्या इतर सर्व प्रमुख निर्देशांकात घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि निफ्टी मिडकॅप 100 या दोन निर्देशांकांमध्ये अनुक्रमे 0.24% आणि 0.12% घट झाली. तसेच सरकारी बँकांसह सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा जोर दिसत आहे.

ट्रम्प यांनी इराणसोबत MoU बाबत विधान करताना कच्च्या तेलाच्या किमतीही भडकल्या आणि जागतिक शेअर बाजारांमध्ये विक्रीचा जोर वाढला. अशा परिस्थतीत, आता गुंतवणूकदार अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंधांच्या पुढील वाटचालीवर लक्ष ठेवून असतील तर, तणाव वाढल्यास कच्चे तेल, चलन आणि शेअर बाजारांमधील अस्थिरता आणखी वाढू शकते.

लक्षात घ्या की FIIs च्या सकारात्मक हालचाली आणि मजबूत स्थूल आर्थिक घटकांच्या जोरावर भारताचा शेअर बाजार हळूहळू मजबूत होत होता, पण या ताज्या तणावामुळे सकारात्मक प्रवाहावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या तरी ‘वेट अन् वॉच’ धोरण अवलंबले पाहिजे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत