Headlines

SEBI Approved 9 IPO ; SEBI चा कल टेक क्षेत्राकडे; 9 नव्या IPO ला मिळाली मंजुरी, गेमिंग आयपीओचीही बाजारात होणार एंट्री


SEBI ने 9 IPO ला मंजुरी दिली आहे. यातील बहुतेक IPO हे टेक क्षेत्रासंबंधित आहेत. गेमिंग, डिजिटल, डिफेन्स टेक तसेच ट्रॅव्हल संबंधित प्रत्येकी 4 IPO लाँच करण्यात येणार असून उर्वरित 5 IPO हे मॅन्युफॅक्चरींग, इन्फ्रास्ट्रक्चर, पेपर तसेच ग्रीन हायड्रोजन क्षेत्रासंबंधित आहेत. यातील बहुतेक IPO हे नव्याने इश्यू करण्यात आलेले आहेत.

SEBI Approved 9 IPO
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने ( सेबी ) 9 IPO ला मंजुरी दिली आहे. शेअर बाजारात लवकरच हे नवीन IPO एंट्री घेणार आहेत. या नव्या IPO मधील बहुतेक आयपीओ हे टेक क्षेत्रासंबंधित आहेत. गेमिंग, डिफेन्स टेक, डिजिटल तसेच ट्रॅव्हल टेकसंबंधित प्रत्येकी 4 नवे आयपीओ टेक क्षेत्रासंबंधित आहेत. त्याचबरोबर इतर नवे आयपीओ इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्युफॅक्चरींग, ग्रीन हायड्रोजन, पेपर तसेच मार्केटिंग सर्व्हिस क्षेत्रासंबंधितआहेत.

टेक क्षेत्रासंबंधित 4 IPO होणार लाँच

प्लेसिम्पल गेम्स IPO हे गेमिंग आयपीओ असून याची लिस्टिंग डेट अद्याप जाहीर नाही. या इश्यूमधे जारी केलेले सगळेच शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) आहेत. हा IPO 3,150 कोटींचा प्रस्तावित असून यात कोणतेही शेअर्स नवीन नाहीत. गरुड एअरोस्पेस IPO ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या IPO लाही SEBI कडून मंजुरी मिळाली असून अद्याप लिस्टिंग डेट किंवा आयपीओ लाँचची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या IPO च्या माध्यमातून कंपनी तब्बल 1000 कोटींची रक्कम जमवण्याच्या प्रयत्नात आहे. 750 कोटींचे शेअर्स फ्रेश इश्यू करण्यात आले आहेत. तर उर्वरित 250 कोटींचे शेअर्स हे ऑफर फॉर सेल्स (OFS) आहेत. Rediff.com India ही कंपनी पूर्णपणे नवे शेअर्स IPO म्हणून लाँच करण्याच्या तयारीत आहे. IPO ला SEBI कडून मंजुरीही मिळाली आहे, त्यामुळे लवकरच आयपीओच्या लाँचची तारीखही समोर येईल. या IPO च्या माध्यमातून 600 ते 800 कोटींपर्यंतचे शेअर्स फ्रेश इश्यू होतील असा अंदाज बांधण्यात आला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या 9 वर्षांपासून ग्राहकांची सेवा करणारी कंपनी SNVA ट्रॅव्हलटेक लवकरच नव्या IPO सह बाजारात उतरणार आहे. या संबंधित SEBI ची मंजुरी त्यांनी मिळवली आहे. त्याचबरोबर 29 मार्च 2026 रोजी कंपनीकडून ड्राफ्ट पेपर फाईल करण्यात आली होती. USA, सिंगापूर, युनायटेड अरब एमिरेट्स तसेच ब्रिटनमध्ये मोठा कारोभार असलेल्या या कंपनीने गेल्या 9 वर्षांत एअर टिकेटिंग तसेच हॉटेल बुकिंगच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा केली आहे. या कंपनीचा IPO फ्रेश इश्यू आहे.

इतर विविध क्षेत्रातून 5 IPO

Jaskon Green कंपनीलाही SEBI कडून मंजुरी मिळाली आहे. ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या कंपनीचा इश्यू साईज किंवा प्राईज बँड अद्याप जाहीर करण्यात आला नाही. मूळची इंदोर येथील असणारी Laxyo या रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या IPO ला ही सेबीने मंजुरी दिली आहे. मार्च महिन्यात या आयपीओचा DRHP दाखल करण्यात आला होता. या IPO चे150 कोटींचे नवे इक्विटी शेअर्स जारी केले जातील. इंजिनिअरिंग क्षेत्रातून येणाऱ्या Adroit Industriesकंपनीच्या IPO ला सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. 1.1247 कोटींचे शेअर्स जारी करण्यात येणार असून यातील 98.97 लाख फ्रेश इश्यू असून 13.50 लाख ऑफर फॉर सेल (OFS) आहेत.

Maharashtra TimesProperty Transfer Rules: तुमची जमीन परदेशात स्थायिक झालेल्या मुलांच्या नावावर होऊ शकते का? फेमा अन् राज्याचे कायदे समजून घ्या
येत्या काही दिवसांत नैनी पेपर्स IPO ही लाँच करण्यात येईल. सेबीने मंजुरी दिली असून सेबीच्या रेकॉर्डनुसार, IPO चे काही शेअर्स फ्रेश इश्यू असतील तर काही ऑफर फॉर सेल (OFS) असतील. याचबरोबर, लवकरच एक्सप्रेशन 360 सर्व्हिसेस इंडिया या कंपनीच्या IPO ला ही मंजुरी देण्यात आली आहे. एकूण दीड कोटींचे इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) म्हणून लाँच करण्यात येणार आहेत.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा