Saudi Aramco Oil Refinery: पश्चिम आशियातील अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यातील संघर्ष आता थांबला असून एकीकडे होर्मुझची सामुद्रधुनीतील अडथळा दूर झाला आहे तर दुसरीकडे, भारतासाठी आणखी एक आनंदवार्ता समोर आली आहे. जवळपास 4 महिन्यांनंतर सौदी अरामकोने आपल्या सर्वात मोठ्या रास तानुरा तेल टर्मिनलमधून तेलाची भरणा पुन्हा सुरू केली आहे.

तर दुसरीकडे, जगातील सर्वात मोठी तेल कंपनी – सौदी आरामको – आपल्या सर्वात मोठ्या तेल निर्यात केंद्र, रास तानुरा टर्मिनल, वर सुमारे 4 महिन्यांनंतर कच्च्या तेलाची भरणी पुन्हा सुरू केली आहे. रास तानुरा सध्या व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर – VLCC – जहाजांमध्ये तेल भरत असून एका VLCC जहाज अंदाजे 20 लाख बॅरल क्रूड वाहून नेऊ शकते. भारत सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो, त्यामुळे या निर्णयामुळे देशाचा तेलपुरवठा मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
AI Bubble Burst: भारताला मागे सारणाऱ्या कोरिया बाजारात पॅनिक सेलिंग, गुंतवणूकदार झाले अलर्ट! ‘एआय’चा फुगा फुटला; Apple च्या धक्क्याने बाजार हादरला
शुक्रवारी रास तानुरा टर्मिनलवर दोन व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर्स तेल भरत होते आणि आणखी एक जहाज तेल भरणार असल्याचे शिपिंग डेटावरून समोर आले आहे. अशा परिस्थतीत., पश्चिम आशियातील स्थिती सामान्य राहिली, तर भारतासह अनेक देशांना कच्च्या तेलाचा नियमित पुरवठा मिळू शकेल असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
4 महिन्यांनी रास तानुरा टर्मिनलचे दार उघडले
मार्च 2026 पासून रास तानुरा टर्मिनलवर तेल भरणे बंद केले गेलेले. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या काळात होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाजवाहतूक विस्कळीत झाली परिणामी, सौदी अरेबियाला बहुतेक तेलाचा पुरवठा Red Sea मधील यान्बू बंदरातून करणे भाग पडलेले. मात्र आता तणाव निवळल्यामुळे रास तानुरा टर्मिनल पुन्हा सुरू झाले, जे सौदी अरामकोचे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र असून जगभरातील अनेक देशांना देशांना इथून पुरवठा होतो. त्यामुळे रास तानुर टर्मिनलवरील कामकाज पुन्हा सुरू झाल्यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी पूर्ववत होण्याची आशा आहे.
ITR भरला तरी टेन्शन! 30 जूनपर्यंत येऊ शकते Tax Notice, जाणून घ्या कारण; ऑनलाईन उत्तर देण्याची सोपी प्रोसेस
भारतासाठी ही खुशखबर कशी?
भारत आपल्या गरजेपैकी 85 कच्चे तेल परदेशातून आयात करतो आणि सौदी अरेबिया प्रमुख सप्लायर्सपैकी आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि रिलायन्स यासारख्या कंपन्या सौदी आरामकोकडून नियमितपणे तेलाची आयात करतात.
ITR भरण्याची तयारी, पण आधी 1 लाख रुपये वाचवणारे Section 80D समजून घेणे अत्यावश्यक, तुमचा मोठा कर वाचेल
अशा परिस्थितीत, रास तानुरा येथून तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्यास भारताला वेळेवर तेल मिळण्यास मदत होऊ शकते आणि पुरवठा सामान्य राहिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची उपलब्धता सुधारेल परिणामी, किमतींवरील दबाव कमी होऊ शकतो. मात्र, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील परिणाम इतर अनेक घटकांवर अवलंबून असेल.

