सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वर तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वेण्णा नदीवरील छोटा पूल खचला. घटनास्थळी पर्यटकांची वाहने अडकल्याने नदीच्या पलिकडील हॉटेल्समध्ये अनेक पर्यटक अडकले होते. प्रशासन आणि बचाव पथकांनी क्रेनच्या साहाय्याने पर्यटकांची वाहने सुरक्षित बाहेर काढली आहेत.
महाबळेश्वरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहरातील सखल भाग जलमय झाला आहे. वेण्णा लेक परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याच परिसरातील रस्ता अतिवृष्टीमुळे खचल्याने वेण्णा नदीचा पूल तुटला. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पुलाच्या पलिकडील बाजूच्या हॉटेल्समध्ये राहणारे शेकडो पर्यटक तिथेच अडकून पडले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. तुटलेल्या पुलावर चार ते पाच वाहने अडकली होती. क्रेनच्या साहाय्याने ती वाहने सुरक्षित बाहेर काढण्यात आली. तसेच हॉटेलमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. लिंगमळा धबधब्याकडे जाणारा मार्ग जलमय झाल्याने पर्यटकांना तिकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोयना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने महाबळेश्वर तालुक्यातील बिरमणी गावचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने त्याठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. ओढ्यावरील अथवा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास नागरिकांनी पाण्यात जाऊन जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
साताऱ्यातील अनेक ठिकाणी धुवाँधार
हवामान विभागाने आज सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई आणि सातारा या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी आणि नदीपात्रात जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केले आहे. तसंच नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा