Headlines

Sarpanch mangesh sable arrested chaos at district collectorate; छत्रपती संभाजीनगरमधील सरपंच मंगेश साबळेंना अटक; गोंधळ घालत जिल्हाधिकाऱ्यांना एकेरी भाषेत आव्हान


छत्रपती संभाजीनगर: निवडणूक आयोगाच्या कामासाठी शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांवरून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गदारोळ पाहायला मिळाला. शाळांमधील शिक्षकांना जर तुम्ही बीएलओ ड्युटी देणार असाल, तर वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायचे कोणी? असा संतप्त सवाल करत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धुमाकूळ घातला. यावेळी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच एकेरी भाषेत आव्हान देत आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या सरपंच साबळे यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सध्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. या कामासाठी प्रशासनाने अनेक शाळांमधील ५० टक्क्यांहून अधिक शिक्षकांच्या ड्युटी लावल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी केला. शिक्षकांना या निवडणूक कामातून तातडीने वगळण्यात यावे आणि ही जबाबदारी इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.

कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचताच सरपंच साबळे यांनी थेट ठिय्या मांडला. पोलिसांनी त्यांना शांत राहून सनदशीर मार्गाने निवेदन देण्याची विनंती केली, मात्र त्यांनी पोलिसांचे ऐकले नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर इथेच आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला. याच दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी विनय गोडा यांना एकेरी भाषेत उद्देशून त्यांना खाली बोलवा, अशी जोरदार घोषणाबाजी करत दालनाबाहेर आरडाओरड सुरू केली. या गोंधळामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर या देखील तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. मात्र, आक्रमक झालेल्या सरपंचांनी त्यांनाही थेट जाब विचारण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत सरपंच साबळे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेले. मात्र, तिथे निवेदन सुपूर्द करतानाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत