Headlines

Sarpanch deepak ugale ends life serious allegations against those demanding resignation; गावाच्या सरपंचाचं धक्कादायक पाऊल; राजीनाम्याच्या मागणीनंतर थेट जीवन संपवलं, स्टेटसवरील व्हिडिओत गंभीर आरोप


Crime News: गावच्या विद्यमान सरपंचानेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

buldhana news
गावाच्या सरपंचाचं धक्कादायक पाऊल; राजीनाम्याच्या मागणीनंतर थेट जीवन संपवलं(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याची असलेल्या गट ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दीपक प्रकाश उगले (वय 46) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उगले यांनी स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोराने गळफास घेऊन जीव संपवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृतकाचा भाऊ श्रीकृष्ण प्रकाश उगले यांनी खामगाव पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून दीपक उगले यांच्या आत्महत्येप्रकरणी वैभव उर्फ भैया दादाराव वर्ग (राहणार, करमोडा) याच्याविरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सरपंच दीपक उगले हे सकाळी स्वतःच्या शेतात झाडाला दोरीने फाशी घेतलेला अवस्थेत आढळून आले. फिर्यादीत नमूद केले आहे की, मृतकाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ काढून स्टेटस ठेवले आहे. “वैभव उर्फ भैय्या दादाराव वर्ग याच्या जाचाला कंटाळून मी माझं आयुष्य संपवत आहे. आरोपी वैभव हा गेल्या तीन वर्षांपासून मला सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असून यासाठी मानसिक छळ करीत आहे, दारू पिऊन कधी प्रत्यक्ष भेटून तर कधी फोनवर जीवे मारण्याचा धमक्या देत आहे. कुटुंबाला संपून टाकीन अशा सुद्धा धमक्या दिल्या जात आहेत. या अशा जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे,” असं सदर व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मृतक सरपंच दीपक उगले यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यावर नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. आरोपीला अटक केल्याशिवाय दीपक उगले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका उगले यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयासमोर काही वेळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आरोपीला लवकर अटक करण्यात येईल, असं आश्वासन तामगाव पोलिसांनी दिल्यानंतर सायंकाळी करमाळा येथे मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा