Sangli Vita Husband Killed Wife Over Suspicion of Character; नवऱ्याला तृतीयपंथीयांचा नाद, बायकोचा कडाडून विरोध, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्घृणपणे संपवलं; तीन वर्षांच्या लेकराला मित्राकडे सोडलं
Sangli Vita Husband Killed Wife Over Suspicion of Character; नवऱ्याला तृतीयपंथीयांचा नाद, बायकोचा कडाडून विरोध, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्घृणपणे संपवलं; तीन वर्षांच्या लेकराला मित्राकडे सोडलं
Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केली आहे.
विटा चारित्र्यावर संशय पत्नीची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : चारित्र्यावर संशय घेऊन तसेच पतीला तृतीयपंथी यांचा नाद असल्याने त्यास पत्नी विरोध करत असल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केल्याचा प्रकार विट्यात घडला आहे. ही घटना काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके (वय २३) असं मृत महिलेचं नाव असून पती आणि संशयित सोनल उर्फ अविनाश तुकाराम लोटके हा फरार झाला आहे. याप्रकरणी मृत काजलची मावशी दीपाली शशिकांत साठे यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी हत्येचा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
अविनाशच्या घराच्या खिडकीतून पाहिले असता आत मोठ्या प्रमाणावर रक्त फरशीवर पडलेले दिसले. त्यावेळी त्याने आरडाओरड केली आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे आतून कडी असल्याचं निदर्शनास आलं. त्यावर रोहितने अविनाशच्या घरमालकाकडे संपर्क साधला आणि त्यांना बोलावून घेतलं. त्यावेळी त्यांनी विटा पोलीस ठाण्याशीही संपर्क केला. पोलीस आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली काजल दिसली. तिच्या डोक्यात जोरदार वार केलेला आढळलेला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी दीपाली साठे यांनी विटा पोलीस स्थानकांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील करीत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा