Sanai Chaughade Actress Friendship : दोन जुन्या मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणण्याचं निमित्त ठरली झी मराठीची ‘सनई चौघडे’, कॉलेजनंतर अधुरी राहिलेली मैत्री पुन्हा जुळली
Sanai Chaughade Actress Friendship : दोन जुन्या मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणण्याचं निमित्त ठरली झी मराठीची ‘सनई चौघडे’, कॉलेजनंतर अधुरी राहिलेली मैत्री पुन्हा जुळली
खरी मैत्री ही काळ, अंतर आणि परिस्थिती यापलीकडे जाऊन टिकून राहते. काही नाती अशी असतात ज्यांचा आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी होतो, पण योग्य वेळ आली की ती पुन्हा पूर्वीइतक्याच आपुलकीने फुलतात. अशीच एक सुंदर मैत्री पुन्हा खुलली आहे ‘सनई चौघडे’ या मालिकेमुळे. मालिकेत ‘पमा परब’ ची भूमिका साकारणाऱ्या मेघना एरंडे जोशी यांनी ‘तेजस्विनी खानोलकर’ ची भूमिका साकारणाऱ्या अदिती सारंगधर सोबतच्या त्यांच्या अनेक वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा एक खास किस्सा सांगितला.
मेघना म्हणाली, “अदिती आणि मी अकरावीपासून पदवीपर्यंत एकाच बॅचमध्ये होतो. ती रुईया कॉलेजमध्ये होती आणि मी रुपारेलमध्ये. एकांकिका स्पर्धांमुळे आमची नेहमी भेट व्हायची. त्या काळात आमच्यात कधीच स्पर्धा नव्हती. आम्ही एकमेकींच्या कामाचं मनापासून कौतुक करायचो. कॉलेज संपल्यानंतर मात्र आयुष्याच्या धावपळीत आमचा संपर्क फक्त ‘हाय-हॅलो’पुरता राहिला.’सनई चौघडे’मुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
Raja Chaudhary On Daughter Custody : पोटच्या मुलीऐवजी निवडला 93 लाखांचा फ्लॅट, घटस्फोटानंतर श्वेता तिवारी अन् राजा चौधरीच्या वाटाघाटी, प्रॉपर्टीसाठी लेकीवर पाणी मालिकेत आमची पात्रं एकमेकींच्या अगदी विरुद्ध आहेत. पमा तेजस्विनीला घाबरते, तर तेजस्विनीला पमाची उपस्थितीही आवडत नाही. पण खऱ्या आयुष्यात चित्र अगदी उलट आहे.आमचे मेकअप रूम शेजारी आहेत. आम्ही एकत्र जेवतो, कॉफी पितो, गाणी ऐकतो, व्हिडिओ पाहतो आणि खूप गप्पा मारतो. अदितीला माझ्या डब्यातले थोडं गोडसर भाज्या असतात ते तिला आवडतात, तर तीही माझ्यासाठी काही खास बनवले कि घेऊन येते. आम्ही राजगिरा लाडू खातो. मी तिला वॉटर सिपर दिला होता, तर तिने मला डिझायनर बॅग ज्यावर खरे घुंगरू विणले आहे खूप सुंदर बॅग भेट दिली आहे.
Sarika Navathe : अवंतिकाच्या सेटवर गावरान भाषेमुळे हसायचे लोक, सारिका नवाथेने ट्रिक शोधून केलेली बोलती बंद माझ्या मके-अप रूम मध्ये स्वामींची मूर्ती आहे ती हमखास येऊन नमस्कार करते. आमच्या गप्पांमध्ये अध्यात्मालाही विशेष स्थान असतं. ती रेकी करते, तर मी प्राणिक हीलिंग करते. त्यावर आम्ही अनेकदा चर्चा करतो. आम्हा दोघींनाही संगीताची खूप आवड आहे. सेटवर वेळ मिळाला की आम्ही एकत्र संगीत ऐकतो, कॉफी पितो आणि एकमेकींसोबत वेळ घालवतो. आमचे स्वभाव मात्र खूप वेगळे आहेत. अदिती खूप ठाम, उत्साही आणि बिनधास्त, रॉकस्टार आहे, तर मी एकदम भावगीत, कमी बोलणारी आहे. पण कदाचित हाच आमच्या मैत्रीचा सर्वात मोठा गुण आहे.
आम्ही एकमेकींना समजून घेतो, एकमेकींची साथ देतो आणि मनातल्या अनेक गोष्टी एकमेकींसोबत शेअर करतो. सेटवर तिचे सीन नसले की तिची खूप आठवण येते. ती आली की वातावरणच आनंदी होतं. ‘सनई चौघडे’मुळे मला माझी जुनी मैत्रीण पुन्हा मिळाली. ही मैत्री आजही तितकीच सुंदर, प्रामाणिक आणि घट्ट आहे. आयुष्याने आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणलं, याचा मला मनापासून आनंद आहे.”
सनई चौघडे या मालिकेबद्दल सांगायचे झाल्यास ही मालिका रात्री 8.30 वा. झी मराठीवर पाहायला मिळते.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा