Headlines

Sam Bankman-Fried FTX Downfall Bankruptcy; बढाई मारणारा क्षणात कंगाल, 24 तासांत 1 लाख करोडोंची संपत्ती थेट शून्यावर… अब्जाधीशाचा रावाचा रंक कसा झाला?

Billionaire Downfall Story: एका तरुण अब्जाधीशावर बढाईखोरपणा त्याच्यावरच उलटला. बिटकॉइन यासारख्या क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता जितक्या झपाट्याने वाढली तितक्याच वेगाने मूल्यात मोठी घट झाली. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणारे कदाचितच सॅम बँकमन-फ्राइड या व्यक्तीला ओळखत नसतील. सॅम बँकमन-फ्रीडने एकाच दिवसात 94% संपत्ती गमावली.

Sam Bankman-Fried FTX Crypto Exchange Downfall Story
एका रात्रीत अब्जाधीश अक्षरश: कंगाल झाला
Riches to RAGs Story: तुम्ही कदाचित रातोरात श्रीमंत बनलेल्या लोकांबद्दल ऐकले असेल पण, कधी तुम्ही एका रात्रीत कोणी गरीब झाल्याचे कधी ऐकले आहे का? क्रिप्टो बाजारात एकेकाळची लोकप्रिय FTX या क्रिप्टो एक्सचेंज कंपनीचे सीईओ सॅम बँकमन-फ्राइडने एकाच दिवसात आपली 94% संपत्ती गमावली. आजपर्यंत कोणत्याही अब्जाधीश व्यक्तीला एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागण्याची ही पहिलीची वेळ होती.

एका रात्रीत अब्जाधीश झाला कंगाल

एका रात्रीत अब्जाधीश झाला कंगाल

बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीमुळे रातोरात श्रीमंत लोकांबद्दल तुम्ही बरच ऐकले असेल, पण यामुळे असंख्य लोकांचे नुकसानही झाले असून एकेकाळी अमेरिकेतील तरुण अब्जाधीश सॅम बँकमन-फ्राइडला बढाईखोरपणा चांगलाच महागात पडला. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी सॅमने एका रात्रीत 94 टक्के संपत्ती गमावली आणि यासह अब्जाधीश म्हणून मिरवण्याचा मानही गमावून बसला.

बढाईखोरपणा महागात पडला

बढाईखोरपणा महागात पडला

सॅम बँकमन-फ्राइडचा बढाईखोरपणा त्याच्यावरच उलटला. सॅमने मोठ्या अतिउत्साहाच्या नादात FTX या क्रिप्टो एक्सचेंजच्या भविष्यातील योजना जाहीर करून टाकल्या. क्रिप्टो एक्सचेंज विकले जात आहे हे कळताच गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेतले, परिणामी एकाच दिवसात सॅमची संपत्ती 16 अब्ज डॉलर्सवरून सुमारे 1 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली.

एक करार केला अन् दिवाळखोरी ओढवली

एक करार केला अन् दिवाळखोरी ओढवली

बायनॅन्सचे सीईओ Changpeng Zhao यांनी सकाळ-सकाळी कंपनीने एफटीएक्सचे अधिग्रहण करण्यासाठी Letter of Intent वर स्वाक्षरी केली.जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बायनॅन्सच्या सीईओने सांगितले की, FTX ‘मोठ्या तरलतेच्या संकटाचा’ सामना करत होती आणि FTX ने बायनॅन्सची मदत मागितल्यानंतर करार केल्यास उघड केले. मात्र, हे इरादा पत्र बंधनकारक नाही, म्हणजेच बायनॅन्सला हवे असल्यास नंतर यातून माघार घेऊ शकते.

एका रात्रीत संपत्ती घटली

एका रात्रीत संपत्ती घटली

Coindesk च्या आकडेवारीनुसार FTX अधिग्रहणाचे वृत्त समोर आल्यानंतर सॅम बँकमन-फ्राइडची अंदाजित संपत्ती 15.2 अब्ज डॉलर्स होती आणि ही बातमी बाहेर आल्यानंतर रातोरात Net Worth मधून अंदाजे 14.6 अब्ज डॉलर्स कमी झाले.

FTX ला इतकं नुकसान का झालं?

FTX ला इतकं नुकसान का झालं?

एकेकाळी FTX ही जगातील दुसरी सर्वात मोठी एफिलिएटेड क्रिप्टो ट्रेडिंग कंपनी होती, पण सॅमने कोणालाही न कळवता FTX मधून ग्राहकांचे 10 अब्ज डॉलर्सचे निधी ट्रेडिंग शाखा, अलामेडा रिसर्चकडे ट्रान्सफर केले. अलामेडाने या निधीचा वापर ट्रेडिंगसाठी केला आणि जेव्हा कंपनीला मोठे नुकसान झाले, तेव्हा FTX सुद्धा गोंधळात सापडली. सततच्या अडचणींचा सामना केल्यानंतर फ्राइडने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला.

अब्जाधीश एका रात्रीत कंगाल झाला

अब्जाधीश एका रात्रीत कंगाल झाला

शेअर बाजारातील चढ-उतारामुळे जगातील श्रीमंतांच्या निव्वळ संपत्तीत अनेकदा मोठे बदल होतात, पण एकूण निव्वळ संपत्तीतील ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण होती. एकेकाळी सॅम बँकमन-फ्रॉइडची निव्वळ संपत्ती अंदाजे 16 अब्ज डॉलर्स होती आणि FTX मधील हिश्श्याचे मूल्य 6.2 अब्ज डॉलर्स व क्रिप्टो ट्रेडिंग हाऊस अलामेडा रिसर्चमधील हिश्श्याचे मूल्य अंदाजे 7.4 अब्ज डॉलर्स होते.

सॅम बँकमन-फ्राइड क्रिप्टोत कसे गुंतले?

सॅम बँकमन-फ्राइड क्रिप्टोत कसे गुंतले?

अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सॅमने शिक्षण घेतले आणि त्याला लहानपणापासून डिजिटल विश्वात रस होता. आपली आवड जपून सॅमने 20213 मध्ये आंतरराष्ट्रीय ETF मध्ये व्यवहार करणाऱ्या कंपनीत काम केले, मग 2017 मध्ये त्याचे नशीब पालटले आणि ‘अलमेडा रिसर्च’ या क्वांटिटेटिव्ह ट्रेडिंग फर्मची स्थापना केली, ज्याला अमेरिकन अब्जाधीश आणि संगणक प्रोग्राम तज्ञ जॉन टॅलिन यांनीही निधी दिला.

शिक्षणानंतर आयुष्याला कलाटणी

शिक्षणानंतर आयुष्याला कलाटणी

त्यानंतर, अमेरिकेच्या तुलनेत जपानमध्ये क्रिप्टोची किंमत वाढली, तेव्हा सॅमला पैसा कमावण्याचा नवीन मार्ग सापडला आणि अमेरिकेतून क्रिप्टो खरेदी करून जपानमध्ये विकू लागला. मात्र, FTX ने सॅमला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आणि 2019 मध्ये क्रिप्टोकरन्सी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज प्लॅटफॉर्मची स्थापना केली. सॅमने आपला संपूर्ण व्यवसाय बहामासमध्ये स्थलांतरित करून कंपनीने बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया – BGMI – या बॅटल रॉयल गेममागील टीम, TSM सोबत भागीदारी करून भारतातील ई-स्पोर्ट्स क्षेत्रातही गुंतवणूक केली.

‘हॉल ऑफ फेम’पासून ‘हॉल ऑफ शेम’पर्यंत

'हॉल ऑफ फेम'पासून 'हॉल ऑफ शेम'पर्यंत

FTX च्या माध्यमातून सॅम यशाच्या शिखरावर पोहोचला, जे जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज प्लॅटफॉर्म बनले. 2021 मध्ये प्रतिष्ठित अमेरिकन व्यावसायिक मासिक – फोर्ब्सने सॅमचा 30 वर्षांखालील 30 सर्वात यशस्वी उद्योजकांच्या यादीत समावेश केला. पण FTX घोटाळा उघडकीस आल्यावर त्याच फोर्ब्सने सॅमला 2023 च्या ‘हॉल ऑफ शेम’मध्ये जोडले. या यादीतील 10 व्यक्तींनी यश मिळवल्यानंतर चुकीचा मार्ग निवडला आणि स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे सॅम बँकमन-फ्राइड या यादीत पहिल्या नंबरवर होता.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा