Maharashtra Assembly amendment bill to bring orchestra bars under anti dance bar law; डान्सबार चालवण्यासाठी ऑर्केस्ट्राचा आधार? फडणवीस सरकारने आता घेतली कडक भूमिका; महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजूरी
Maharashtra Assembly amendment bill to bring orchestra bars under anti dance bar law; डान्सबार चालवण्यासाठी ऑर्केस्ट्राचा आधार? फडणवीस सरकारने आता घेतली कडक भूमिका; महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजूरी
Orchestra bar law maharashtra : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर डान्सबारना आळा घालण्यासाठी सरकारने महत्त्वाचं सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर केलं आहे. या निर्णयामुळे नेमके कोणते नियम बदलणार?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यातील ऑर्केस्ट्रा बारसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर आता अधिक कडक कारवाई होणार आहे. यासाठीचं सुधारणा विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर लगाम लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आतापर्यंत ऑर्केस्ट्रा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार परवाना दिला जात होता. मात्र, अनेक ठिकाणी याच परवान्याचा आधार घेऊन प्रत्यक्षात डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारी गृहविभागाकडे आल्या होत्या. ही पळवाट बंद करण्यासाठी सरकारने आता ऑर्केस्ट्रालाही डान्सबारविरोधी कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमासह २०१६ च्या डान्सबारविरोधी कायद्यातही बदल करण्यात येणार आहेत. विधानपरिषदेची मंजुरी आणि राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर हा कायदा लागू होईल.
निर्णयामागचा उद्देश काय?
सरकारच्या मते, या बदलामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली नियम मोडणाऱ्या बार मालकांवर थेट कारवाई करता येणार आहे. महिलांचं शोषण रोखणं, त्यांच्या सन्मानाचं संरक्षण करणं आणि कायद्यातील पळवाट बंद करणं, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे, यावर यापुढे प्रशासनाचं अधिक लक्ष असणार आहे. नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास संबंधितांवर डान्सबारविरोधी कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे या निर्णयाचा राज्यातील ऑर्केस्ट्रा बार व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
सरकारचा दावा आहे की, या बदलामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल. अनेक ठिकाणी परवान्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यामुळे अशा प्रकरणांवर कारवाई करताना कायद्यातील अडचणी दूर करण्यासाठी ही सुधारणा करण्यात आल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. आता संबंधित बारची तपासणी, परवान्यांच्या अटींची पडताळणी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणं प्रशासनाला अधिक सोपं होणार असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा