Headlines

Maharashtra govt mandates domicile certificate for bike-taxi permits Pratap sarnaik; अनधिकृत बाईक-टॅक्सींवर टाच, आता ‘हे’ प्रमाणपत्र सक्तीचं, विधानसभेत परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा


Pratap Sarnaik on Illigal Taxi Bike: महाराष्ट्रात बाईक-टॅक्सी चालवण्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट अनिवार्य करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. या निर्णयामागची कारणे, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि स्थानिक रोजगारावर होणारा परिणाम यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले.

Illigal Taxi Bike Maharashtra
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रातील हजारो बाईक-टॅक्सी चालकांवर परिणाम करणारी मोठी घोषणा आज विधानसभेत झाली. राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी आता महाराष्ट्राचे डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. अनधिकृत वाहतूक, महिला सुरक्षेचे प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात ही भूमिका स्पष्ट केली.

आमदार विलास लांडे यांनी विषय मांडला

या विषयाची सुरुवात शिवसेना (शिंदे गट)चे आमदार दिलीप लांडे यांनी केली. रस्त्यांवर विनापरवाना बाईक-टॅक्सींची संख्या वाढत असल्याचा दावा करत, अनेक चालकांकडे वैध परवाना, आवश्यक कागदपत्रे किंवा पोलीस पडताळणी नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे नमूद करत त्यांनी अशा चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे उत्तर

त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “राज्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढत आहे. परप्रांतातून अनेक जण महाराष्ट्रात येतात, बाईक खरेदी करतात आणि थेट वाहतुकीचा व्यवसाय सुरू करतात. हा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र असेल, त्यांनाच वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.”

Maharashtra TimesMumbai High Court : ‘सापत्न वागणूक देणे अस्वीकारार्ह’; निवृत्त कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ला खडसावले, नेमकं प्रकरण काय?

शासनाला फायदा होणार, सरनाईकांचा दावा

सरकारच्या मते, या निर्णयामुळे बेकायदेशीर वाहतुकीवर आळा बसेल, प्रवाशांच्या सुरक्षेत सुधारणा होईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चालकांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. यासोबतच स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी वाढतील आणि शासनाच्या महसुलातही भर पडेल, असा दावा सरनाईक यांनी केला.

निर्णयाच्या अंमलबजावणीकडे लागलं लक्ष

दरम्यान, सरकारच्या या घोषणेनंतर बाईक-टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्या, विद्यमान चालक आणि नव्याने या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये बाईक-टॅक्सींचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने सरकारच्या या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कधी आणि कोणत्या नियमांनुसार होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा