Headlines

Gargi Phule : ‘तुम्ही रीलस्टार म्हणजे कोण आहात? टोल भरणं सरकारचा नियम’, महेश मोटेच्या व्हिडिओवर गार्गी फुलेंचा टोमणा


Gargi Phule : गार्गी फुले यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रीलस्टारबद्दल भाष्य केलं आहे. त्याचबरोबर रील स्टार महेश मोटेच्या व्हायरल टोल नाकाच्या व्हिडिओवरही भाष्य केलं आहे.

Gargi Phule On Mahesh Mote
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री गार्गी फुले स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये गार्गी फुले यांनी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरबद्दल भाष्य केलं होतं. त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आलेलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये गार्गी यांनी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरबद्दल भाष्य केलं आहे. रील स्टार हे अभिनेते नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.

रील स्टारबद्दल गार्गी यांचं वक्तव्य

मुलाखतीदरम्यान गार्गी फुले म्हणाल्या की, ‘मी एक-दोन मुलाखतींमध्ये म्हणालीये की, रील स्टार हे कलाकार नाहीत. फॉलोअर्स बघून काही वाहिन्यांनी त्यांना कामंसुद्धा दिली. पण, ते कलाकार नाहीत, स्टार आहेत. यामुळे मी ट्रोलही झाले. खूप जण म्हणाले, आम्ही कंटेंट करतो, त्याची मेहनत नाहीये का? मी म्हणेन आहे तुमची मेहनत. पण, अभिनय हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा अभिनेता किंवा अभिनेत्री हा मुद्दा नाही येऊ शकत. कलाकारांची १०-१० वर्षांची मेहनत आहे. पण रील स्टार म्हणतो मी अभिनेता आहे, तर ते योग्य नाही.’

माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से

गार्गी पुढे म्हणाल्या की, ‘एका रील स्टारचा टोलनाक्यावरील व्हिडिओ व्हायरल झालेला. माझं असं झालं की, तुम्ही रील स्टार आहात म्हणजे कोण आहात? तो सरकारचा नियम आहे, तुम्ही द्या ना. मला गंमत वाटली ते बघून. हे फुकट आहे म्हणून तुम्ही बघताय. त्यावर पैसे लावा, मग ते बघणं बंद होईल.’
Maharashtra TimesKamlesh Sawant : ‘माझे ७० लाख बुडाले आहेत’, मराठी अभिनेते कमलेश सावंत यांचा दावा, सांगितला किस्सा
गार्गी म्हणाल्या की, ‘एका रील स्टारचा सिनेमा आलेला आणि त्या सिनेमाला कुणीही गेलं नाही. तो सिनेमा विचित्र पद्धतीनं फ्लॉप झाला. आज ते फुकट आहे, म्हणून तुम्ही आहात. हे सर्कल आहे, कधी ना कधी ते बंद होईल. अभिनय असं आहे की, तुमचं वय ८० असेल किंवा तुम्ही पाच वर्षांचे जरी असाल तरी अभिनय कुठे जात नाही. ती शिकवलेली आणि शिकलेली कला आहे.’
Maharashtra TimesHema Malini : ‘एकत्र राहा…’, मृत्यूपूर्वी धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना सांगितलेलं मनातलं सगळं काही, वाचून येईल डोळ्यात पाणी
दरम्यान, गार्गी फुले यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘तुला पाहते रे’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा